💥चारठाणा येथे भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचे जंगी स्वागत.....!


💥याप्रसंगी परिसरातील सर्वधर्मीय नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते💥


थायलंड येथील ११० बौद्ध भिख्खू सहभागी असलेली परभणी ते चैतन्यभुमी दादर मुंबई भव्य बौध्द धम्म पदयात्रेचे दुपारी तिनच्या सुमारास आगमन झाले भिख्खू संघाचे,यात्रेकरूंचे तसेच आयोजक सिध्दार्थ हत्तिअंबिरे यांचे स्वागत माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य असगर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


यावेळी माजी सरपंच बि.जी.आबा चव्हाण,माजी पं.स.सदस्य मधुकर भवाळे,अमोल उर्फ श्रीधर भवरे,जलील इनामदार,निसार देशमुख, सुलेमान शेख,आत्मारामजी मेहेत्रे,जिवन भवरे,शफिक शेख,तारेक देशमुख,दिलिप भवाळे,आरेफ कुरेशी,बाबा शेख,लायक कुरेशी,आदी उपस्थीत होते.

चारठाणा टि.पाईंन्ट येथे थायलंडच्या भंते लांगफू यांनी थाई भाषेत धम्मदेशना दिली व त्याचा मराठीत अनुवाद अौरंगाबाद येथील भन्ते अभयपुत्र यांनी केला याप्रसंगी परिसरातील सर्वधर्मीय नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या