💥राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकार विजय कुलकर्णी यांना चौथा स्तंभ पुरस्कार प्रदान...!


💥मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यस्तरीय चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न💥

परभणी/प्रतिनिधी

पत्रकारितेतील शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल परभणी येथील पत्रकार विजय कुलकर्णी यांना दि. ६ जानेवारी रोजी दर्पण दिनी मुंबई येथील यशवंतराव चव्हण सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अप्रतिम मीडियाच्या वतीने दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यस्तरीय चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकारितेत योगदान देणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर, सिने अभिनेते व निर्माते मंगेश देसाई, विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर तसेच एमएस आरडीसीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक अभिजीत पाटील, निमंत्रक उद्योगपती विवेक देशपांडे व रणजीत कक्कड यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील विविध विषयांवर पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. विजय कुलकर्णी हे गेल्या अनेक वर्षांपासून परभणी येथे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. अप्रतिम मिडीयाचे संचालक डॉ. अनिल फळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विवेक देशपांडे यांनी केले. या पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल विजय कुलकर्णी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या