💥जिंतूर तालुक्यातील आडगाव (द) येथील श्री.तुळजाभवानी कारखान्यात प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण संपन्न....!


💥प्रजासत्ताक दिना निमित्त आज कारखान्यात विविध उपक्रमाचे आयोजन💥


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.२६ जानेवारी) - तालुक्यातील आडगाव (द) येथील श्री. तुळजाभवानी शुगर प्रा.लि.कारखान्यात आज गुरुवार दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून कारखान्याच्या चेअरमन सर्व भावनाताई सचिन मुंगसे पाटील (बोर्डीकर) यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले.त्यामध्ये चेअरमन यांच्या हस्ते कारखान्यातील सबंध अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोफत ड्रेसचे वाटप करण्यात आले. तसेच कारखाना स्थळी नेत्र तपासणी व धनुर्वात (टीटी) इंजेक्शन शिबिर आयोजित केले होते.त्यामध्ये ऊस वाहतूक करणारे सर्व ट्रॅक्टर चालक यांच्यासाठी रक्त तपासणी शिबिर सुद्धा संपन्न झाले सदरील शिबिराचा कारखान्यातील सर्व कर्मचारी ठेकेदार यांनी लाभ घेतला.

सदरील कार्यक्रमास कारखान्याचे टेक्निकल डायरेक्टर सुधीर साळुंखे, व्यंकट कदम,जनरल मॅनेजर सुशील पाटील,आडगाव (द) येथील माजी सरपंच बबनराव जायभाये,चीफ इंजिनिअर गणेश गंगणे,चीफ केमिस्ट अण्णासाहेब ढवळे,शेतकी अधिकारी मुंजाजी वाव्हळ,हेड टाईम कीपर मदन जाधव,स्टोरकिपर सुधाकर कदम, सुरक्षा अधिकारी बाबासाहेब होगे व सर्व खाते प्रमुख विभाग प्रमुख व कारखान्यातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या