💥नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची तृतीय पंथियांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट....!


💥यावेळी पालकमंत्री महाजन यांनी येणाऱ्या ग्रामसेवक भरतीत तृतीयपंथीयांना संधी देण्याचे दिले आश्वासन💥

नांदेड (दि.२७ जानेवारी) - नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रजासत्ताक दिना निमित्त नांदेड येथे आले असता पालकमंत्री महाजन यांची शिवाजी नगर येथील हॉटेल विसावा पॅलेस येथे तृतीयपंथी शिष्टमंडळाने भेट घेतली.

यावेळी तृतीय पंथियांच्या शिष्टमंडळाने त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली यावेळी बोलतांना पालकमंत्री महाजन यांनी येणाऱ्या ग्रामसेवक भरती मध्ये तृतीय पंथीयांना प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी नांदेड जिल्ह्यातील तृतीय पंथीयांच्या सर्व महत्वपुर्ण विषयावर त्यांनी समाधानकारक उत्तर देऊन त्यांना सर्वतोपरी शासन मदत करेल असे आश्वसन देखील दिले.
याप्रसंगी फरीदा बकश,अर्चना बकश,बिजली बकश,चाहत बकश यांच्यासह कमल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ळ अमरदीप गोधने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या