💥राष्ट्रवादीच्या उपोषणाला यश : प्रधानमंत्री आवास योजनेतील अनागोंदी कारभारास कारणीभूत मंगेश देशमुख सक्तीच्या रजेवर....!

 


💥लाभार्थांना तात्काळ अनुदान वाटप करावे याकरिता शहराध्यक्ष प्रताप कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती उपोषणास सुरुवात💥


पुर्णा (दि.२५ जानेवारी) - प्रधानमंत्री आवास योजनेची योग्य पध्दतीने अंमलबजावणी न करता या योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक मानसिक पिळवणूक करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान वाटप करण्यात यावे या मागणी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रताप कदम यांच्या नेतृत्वाखाली परशुराम उर्फ बाळू जोगदंड,संतोष सातपुते,कृष्णा कदम,गिरीष सोळंके यांच्यासह वयोवृध्द लाभार्थी वस्सलाबाई मेघमाळे यांनी पुर्णा नगर परिषद कार्यालया समोर दि.२४ जानेवारी २०२३ रोजी आमरण उपोषणास सुरुवात केली होती.


प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ न्याय मिळावा व या योजनेची अंमलबजावणी करण्यास अकार्यक्षम ठरलेल्या अभियंता मंगेश देशमुख यांच्यावर कारवाई व्हावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रताप कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आमरण उपोषणाची आज प्रभारी मुख्याधिकारी श्री.कदम व नगर परिषद प्रशासनाने दखल घेऊन जा.क्र/नपपू-२/२३२/२०२३ कार्यालय नगर परिषद पुर्णा या द्वारे लेखी स्वरुपात येत्या दहा दिवसात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यासह योजनेच्या अंमलबजावणीची जवाबदारी असलेले अकार्यक्षम अभियंता मंगेश देशमुख यांना दि.२३ जानेवारी २०२३ रोजी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे व त्यांच्या जागेवर संगणक अभियंता सिध्दार्थ गायकवाड व त्यांना सहकारी म्हणून सब ओवर सियर संजय दिपके यांची नेमणूक केल्याचे कळवून आमरण उपोषण तात्काळ मागे घेण्याची विनंती करण्यात आल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रताप कदम सहकारी उपोषणार्थींनी आपले उपोषण मागे घेतले.......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या