💥गृहविज्ञानातून सक्षम समाज निर्माण शक्य - राधाताई दुधाटे


💥निसर्ग शहलीचा चिमुकल्या नी घेतला आनंद💥 


          घर संसारात योगदान देताना स्त्रियांनी परिवारासह परिस्थितीचा ही अभ्यास करावा.गृहविज्ञान सारख्या विषयाचं आकलन करत आपल्या कुटुंबाला आणि अवतीभोवतीच्या समाज घटकाला सक्षम व निरोगी ठेवण्यासाठी युवतींनी सदैव प्रयत्नशील राहावे.

शेतीसह शेतीपूरक उद्योगांची सांगड घालत सौ.मीराताई आणि जनार्दन आवरगंड यांनी समाजा समोर ठेवलेला कृतीशील विचार आत्मसात करत उद्योगशीलतेला शिक्षण,संस्कार,आणि प्रामाणिक परिश्रमाची जोड देत उन्नत समाज निर्माण करावा,असे आवाहन सौ.राधाताई दुधाटे यांनी केले.


    कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय,परभणी गृहविज्ञान विद्याशाखा आणि ओंकार गृहउद्योग ,माखणी च्या वतीने आयोजित शेती सहल उपक्रमात सौ.राधाताई दुधाटे बोलत होत्या.व्यासपिठावर भगवानराव दुधाटे,सौ.प्रयागबाई आवरगंड, मुख्याध्यापक संजय जोशी, प्रा.अरुण पडघन,प्रा.माया जाधव,प्रा.साधना लंगोटे, यांची उपस्थिती होती.

    निसर्ग शहलीचा चिमुकल्या नी घेतला आनंद शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड दिल्यास शेतकरी आपल्या मालाची विक्री सहज करु शकतो सर्व सामान्य माणूसच खरीददार होत शेती व्यवसायाला बळकटी देवू शकतो.माझ्या ओंकार गृहउद्योग समूह माखणी च्या माध्यमातून आमचं शेतकरी संघटन एकजूटीनं कार्य करीत आहे.समाजाची गरज भागवत आहे. घर कुटुंबा सह समाजासाठी जगण्याचा आनंद अगणिक असल्याचा अनुभव उद्योजक शेतकरी जनार्धन आवरगंड  यांनी व्यक्त केला.सौ.मीरा आवरगंड यांनी प्रात्यक्षिक करुन पदार्थ कसे बनवले जातात हे सांगीतले.

   कुटुंबातील माणसां साठीचा आहार आणि त्याच शास्ञ माणसाच्या जीवनात आहाराचे ऋतूनुसार महत्व कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय,परभणी गृहविज्ञान विभागाच्या प्रा.माया जाधव यांनी सांगितले शेतीपूरक व्यवसाय ही काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी उद्योजक बनावे.त्यांच्या मालाची आपण सर्वांनी खरेदी करावी असे प्रतिपादन केले.

           जनार्धन आवरगंड यांनी आपल्या अनुभवजन्य ज्ञानाच्या आधारे माखणी सारख्या खेड्यात शेतीपूरक व्यवसायाची सुरुवात केली.बायोगॅस, सोलार उर्जेचा शेती साठी वापर करीत शासकीय योजनांच्याआधारे प्रामाणिक परिश्रमाच्या बळावर शेतकरी समुह निर्माण करीत शेतीला आधुनिकते सह व्यवसायाची जोड दिली. त्यांचा हा अभ्यास आत्मसात करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाच्या  गृहविज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनीनी ज्ञान घेतले.ही आम्हासाठी अभूतपूर्व संधी असल्याचे मत प्रा.अरुण पडघन यांनी व्यक्त केले.

             कु.तेजस्विनी  आवरगंड हीने आपल्या भाषणातून निसर्ग वर्णन करीत रानभाज्याचे महत्व सांगितले विषयुक्त भाज्यांपासून स्वतः सह समाजाला वाचवावे असा मौलिक संदेश ही दिला.तर अंकिता दूध वडे बायोगॅसच्या प्रशिक्षणा विषयी मनोगत व्यक्त केले प्रशाली धुतडे मी शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे शेतीतील शेती पूरक व्यवसाय मला खूपच आवडला याविषयी मार्गदर्शन केले

      या शैक्षणिक सहलीत कै सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी गृहविज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यीनी वृषाली धुतडे, प्रीती राऊत ,प्रियंका भालेराव आकांक्षा ईक्कर,अंकिता दुधवडे ,निकिता सूर्यतळ ,आरती सोनकांबळे, निकिता सोनवणे ,गीता पारवे ,दिपाली मोरे, सपना डुकरे ,वैष्णवी धर्माधिकारी सह जिल्हा परिषद प्रशाला माखणीचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.नीसर्ग रम्य वातावरणात भोजनाचा स्वाद घेतल,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जोशी यांनी केले.राजकुमार ढगे यांनी आभार मानले.शिक्षक राजकुमार ढगे,सुरज पौळ,सुनिल शेळके, गजान पवार, बालासाहेब आवरगंड,राम महाजन,सौ‌.ज्योती झटे, शिवानी आवरगंड,ओंकार आवरगंड  आदींनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या