💥परभणी जिल्ह्यात राज्य शासनाच्या शासकीय सुट्या व्यतिरिक्त स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकारातील सुट्ट्या जाहीर....!


💥जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी यंदाच्या वर्षातील तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या💥

 परभणी (दि.17 जानेवारी) : राज्य शासनाच्या शासकीय सुट्ट्यांव्यतिरिक्त स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकारातील सुट्ट्या जाहीर करण्याच्या अधिकारानुसार आज जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी यंदाच्या वर्षातील तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. 

ऊर्स दर्गाह सय्यद शाह तुराबुल हक, परभणी यात्रेनिमित्त गुरुवार, दि. 2 फेब्रुवारी 2023, धनत्रयोदशीनिमित्त शुक्रवार, दि. 10 नोव्हेंबर 2023 आणि (चंपाषष्टी) खंडोबा यात्रेनिमित्त सोमवार, दि. 18 डिसेंबर 2023 रोजी अशा एकूण तीन सुट्टया अधिसूचनेद्वारे घोषित केल्या आहेत. 

परभणी जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेअंतर्गंत कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्थांना या सर्व सुट्टया लागू राहतील. या अधिसूचनेद्वारे लागू केलेल्या सुट्ट्या जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय केंद्र शासनाची कार्यालये आणि बँकांना लागू होणार नाहीत, असे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या