💥पूर्णा तालुक्यातील लिमला येथील जय किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी रवाना...!


💥या शैक्षणिक सहलीच्या बसला संस्थेचे उपाध्यक्ष दुर्गादास जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवला💥

पूर्णा (दि.१८ जानेवारी) - तालुक्यातील लिमला येथील जय किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेची शैक्षणिक सहल  कोल्हापूर,देवगड,महाबळेश्वर ,महाड, प्रतापगड, रायगडला आज बुधवार दि.18 जानेवारी 2023 रोजी दुपारी 01-00 वाजता शाळेच्या प्रांगणवरून रवाना झाली. या शैक्षणिक सहलीच्या बसला संस्थेचे उपाध्यक्ष दुर्गादास जोशी, कार्यवाहक विष्णू जोगदंड, मुख्याध्यापक राजेश्वर पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सहली ला प्रारंभ केला. 

या सहली साठी राज्य परिवहन महामंडळ च्या विठाई 3 बसनी हा प्रवास होणार आहे.या बस मध्ये शैक्षणिक सहलीसाठी 130 विध्यार्थी व 10 शिक्षक व 2 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे श्री मीठापुरे, श्री वाकलें, श्री ठोके या तीन चालकांचा समावेश आहे.

सहा दिवसाच्या या शैक्षणिक सहली मध्ये ऐतिहासिक, नैसर्गिक, धार्मिक स्थळांना भेटी देणार आहे.यात प्रामुख्याने वाई, पाचगणी व महाबळेश्वर हे नैसर्गिक ठिकाण तर महाड ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  "चवदार तळ्याचा जो सत्याग्रह " केला होता त्या तळयाला भेट द्यायचे आयोजित केले आहे, पुढे प्रतापगड, व स्वराज्याची राजधानी दुर्गेदुर्गेश्वर "रायगड" सह तीन किल्ल्यांना भेट देणार आहेत. कापूस माणूस दोन समुद्रकिनारा वरील बीच चा समावेश करण्यात आलेला आहे. 

या  शैक्षणिक सहलीसाठी अनंत काळे ,विजय कदम, हनुमंत हंबीरे,राम गोटमुकले, मनोज जडगे, अनंत पांचाळ, मंचक आचने, मीरा जाधव, गजानन देशमुख बी.डब्लू.काळे, मोहन काळे, वसंत हातागळे, कलावती गलांडे पुढाकार घेत आहेत या शैक्षणिक सहलीला शुभेछा देण्यासाठी लिमला, दगडवाडी, बामणी ,वझुर, इठ्ठलापूर,  दस्तापूर, शिरशी मजलापूर,खडाळा,कमलापूर,पाथरा, देवठाणा देऊळगाव या गावाची पालक उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या