💥सोनपेठ पंचायत समिती कार्यालयात पशुपालकांचे स्नेहमिलन व हितगुज कार्यक्रम संपन्न...!


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.गोविंद राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी एम.पी.कदम उपस्थित होते💥

परभणी (दि.१४ जानेवारी) : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंचायत समिती सोनपेठ येथे पशुपालक स्नेहमिलन व हितगुज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गोविंद राठोड व प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी एम. पी. कदम उपस्थित होते. 

तसेच पशुसंवर्धन विभागातील डॉ. समीर भालके, रामेश्वर टरपले शिवराज मोराळे, सुनिल पोटभरे एम. यु. चौधरी व इतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. समीर भालके यांनी 'माझा गोठा स्वच्छ गोठा' या महाराष्ट्र शासनाच्या मोहिमेविषयी सखोल मार्गदर्शन केले, डॉ. गोविंद राठोड यांनी शासनाच्या विविध योजनेविषयी माहिती दिली. एम. यु. चौधरी यांनी मुरघास तंत्रज्ञानाबाबत सखोल मार्गदर्शन केले.  रामेश्वर टरपले यांनी पशुपालकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज मोराळे, प्रकाश तिरमले व आदींनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या