💥परभणी ते चैत्यभूमी धम्म पदयात्रेतून बुध्द अस्थिदर्शन.....!


💥संयोजक सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली माहिती💥

परभणी (दि.14 जानेवारी) : आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खू संघ,थायलंड येथील 110 भिक्खूंचा सहभाग असणारी देशातील पहिली धम्म पदयात्रा परभणी ते चैत्यभूमी, दादर मुंबईपर्यंत मंगळवारी  दि.17 जानेवारी 2023 रोजी ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावरुन सकाळी 11.30 प्रस्थान करणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु. जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांची पत्रकार परिषदेत यांनी दिली.


         यावेळी  मुख्य समन्वयक ज्येष्ठ नेते विजयराव वाकोडे, बौद्ध धम्म पदयात्रा समन्वय समितीचे डॉ.प्रकाश डाके, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, डॉ.प्रकाश डाके यांची उपस्थिती होती. मंगळवारी (दि.17) सकाळी 8.30 वाजता परभणी येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला अभिवाद करून या धम्म पदयात्रेस प्रारंभ होईल व चौत्यभूमी, दादर मुंबई येथे दि. 15 फेब्रुवारी रोजी यात्रेचा समारोप होईल.

धम्म पदयात्रेचा मार्ग परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक - कल्याण- ठाणे - चैत्यभूमी दादर मुंबई असा असणार असून थायलंड येथील 110 भिक्खूंसमवेत 570 स्थानिक नागरिकही या धम्म पदयात्रेत सहभागी होणार आहेत, असे ते म्हणाले.

         भव्य कार्यक्रमाचे उद्घाटक भंते लांगफुजी, (थायलंड), प्रमुख पाहुणे भंते भदंत सॉगसेन फँटफियन (थायलंड), भंते विचीयन अबोत (श्रीराजगीर, थायलंड), भंते डॉ.उपगुप्त महाथेरो, पूर्ण, बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर, (राष्ट्रीय कार्याध्यक्ष बौद्ध महासभा), कॅप्टन कटकीत (थायलंड), सिरीलक मेथाई (थायलंड) प्रसिद्ध सिनेअभिनेते गगन मलिक आदींच्या उपस्थिती होणार आहे.

          या ऐतिहासिक सोहळयाचे मुख्य आकर्षण म्हणजे तथागत बुद्धांच्या थायलंड येथे जतन केलेल्या व ऐतिहासिक नोंद असलेल्या अस्थी विशेष राजदूतामार्फत भारतात पहिल्यांदाच येत आहेत, असे श्री. हत्तीअंबिरे यांनी सांगितले. अथक प्रयत्नातून हा पवित्र अस्थी कलश भारतात आणण्यात येत असून सर्वांनी पवित्र अस्थी - दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हत्तीअंबीरे यांनी केले.

          दरम्यान, बुद्ध मूर्ती वाटप व आंतराष्ट्रीय भिक्खू संघाची धम्म देसना श्रवण करण्याचीही संधी मिळणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक भंते लांगफुजी, (थायलंड) यांच्या हस्ते पंचशील ध्वज दाखवून व मान्यवरांच्या उपस्थितीत धम्म पदयात्रेचा शुभारंभ होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या