💥परभणी जिल्हा प्रवाशी महासंघ व ग्राहक पंचायतच्या वतीने मानवतला प्रवाशी दिन साजरा....!


💥यावेळी बसस्थानक प्रमुख,एसटीचे चालक व वाहक तसेच सफाई कर्मचारी,प्रवाशांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार💥

मानवत प्रतिनिधी

परभणी/मानवत (दि.२८ जानेवारी) - परभणी जिल्हा प्रवाशी महासंघ व ग्राहक पंचायतच्या वतीने आज शनिवारी दि.२८ जानेवारी २०२३ रोजी रथसप्तमीच्या दिवशी मानवत येथील बसस्थानकात प्रवाशी दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी बसस्थानक प्रमुख, एसटीचे चालक व वाहक तसेच सफाई कर्मचारी,प्रवाशांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास प्रवाशी महासंघाचे जिल्हाध्यक्ष के डी वर्मा, तालुकाध्यक्ष ऍड गजानन शिंदे, श्रीमती घाटूळ , श्रीमती कच्छवे, ग्राहक पंचायत चे जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश करपे, तालुकाध्यक्ष डॉ सचिन चिद्रवार, शहराध्यक्ष श्याम झाडगावकर, सचिव प्रसाद जोशी, दिनेश भालेराव, वैजनाथ करंजीकर व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या