💥शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे दुःखद निधन....!


💥उद्या सोमवार दि.02 जानेवारी रोजी बहादरपुरा येथे सायंकाळी 4.00 वाजता होणार अंत्यसंस्कार💥

नांदेड (दि.01 डिसेंबर) :-  शेतकरी कष्टकऱ्यांच्या विकासासाठी वेळोवेळी आग्रही भूमिका घेणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व,स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांचे वार्धक्यामुळे आज दुःखद निधन झाले. वयाच्या 102व्या वर्षी त्यांनी आज दुपारी अखेरचा श्वास घेतला. औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते.

महाराष्ट्राच्या विधानसभेत नांदेड जिल्ह्यातील कंधार सारख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या भागाचे त्यांनी प्रदीर्घकाळ प्रतिनिधित्त्व केले. डोंगराळ व दुर्गम भागातील शेतकरी, कष्टकरी यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी वाचा फोडून आयुष्यभर आग्रही भूमिका घेतली. आपल्या राजकीय कारकीर्दीत संघर्षाची त्यांनी भूमिका घेतली असली तरी व्यक्तिगत पातळीवर सर्वांशी जपलेला स्नेह व स्पष्ट वक्तेपणा अशी ओळख त्यांनी शेवटपर्यंत जपली त्यांच्या शताब्दीनिमित्त विधिमंडळातर्फे काही महिन्यांपूर्वी भव्य सत्कार करण्यात आला होता.  त्यांच्या योगदानाबद्दल विधिमंडळात मान्यवरांनी केलेल्या गौरवाने ते भारावून गेले होते.

त्यांचे पार्थिव औरंगाबाद येथून  बहादरपुरा येथे आज रात्री दहा पर्यंत पोहोचेल. उद्या दिनांक 2 जानेवारी रोजीबहादरपुरा येथील त्यांच्या शेतातील राहत्या घराजवळ सायंकाळी 4.00 वाजता  त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले जातील अशी माहिती त्यांच्या परिवारातर्फे कळविण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या