💥मराठी भाषीकांनी मराठी भाषेचे संवर्धन करणे आवश्यक - न्यायधीश नंदा घाटगे


💥स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी केले प्रतिपादन💥

पूर्णा (जं) प्रतिनिधी -  आपल्या भावना समजण्यासाठी आपल्याच मातृभाषेचा उपयोग होत असतो म्हणून मराठी भाषीकांनी मराठी भाषेचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन श्रीमती न्यायाधीश नंदा घाटगे यांनी केले. 

त्या येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की सध्या मराठी भाषेवर अनेक भाषांच्या शब्दांचे आक्रमण  होत आहे ते आपण थांबविले पाहिजे तरच आपली भाषा समृद्ध पणे व्यवहारात टिकून राहील असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. याकार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.सोमनाथ नागठाणे यांनी केले तर शासनाची भाषेविषयीची भूमिका प्रा. डॉ. मारोती भोसले यांनी मांडली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रोफेसर डॉ. रामेश्वर पवार होते. 

याप्रसंगी विचार पीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संतोष कु-हे ,वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिनेश काळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. दिपमाला पाटोदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या