💥समाज घडवणाऱ्या सज्जनांचे संगोपन करा - डॉ.विठ्ठल लहाने


💥जिंतूर विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रम💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर रत्न व युवारत्न पुरस्कार वितरण सोहळा डॉ. विठ्ठल लहाने यांच्या हस्ते रविवारी, दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी जिंतूर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्रीधर भोंबे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विठ्ठल लहाने, तसेच शिक्षणाधिकारी श्री. विठ्ठल भुसारे, जिंतूर विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. सुनिल बुधवंत आणि उपाध्यक्ष श्री. बलराम सोनी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती


प्रास्ताविकात ॲड. सुनिल बुधवंत यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका स्पष्ट करताना, आयुष्यभर समाजसेवेची कास धरून कार्य करणाऱ्या आपल्या आदर्श व्यक्तिमत्त्वांना समाजासमोर आणण्यासाठीचा हा खटाटोप असल्याचे सांगितले.

याप्रसंगी जिंतूर रत्न प्रा. सदानंद पुंडगे सर यांचा शैक्षणिक, सामाजिक, साहित्य क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून जिंतूर रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आणि श्री. प्रताप देशमुख यांचा व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून जिंतूर युवारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी श्री. प्रताप देशमुख यांनी कष्ट आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टीचे महत्त्व सांगितले तर प्रा. सदानंद पुंडगे यांनी त्यांच्या आयुष्याचा लेखाजोखा सांगत ज्ञान हे बंद खोलीतून बाहेर येऊन सर्वांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी आयुष्यभर कार्य केल्याचे सांगितले. 

डॉ. विठ्ठल लहाने यांनी सज्जनांचे संगोपन करायला हवे असे ठासून सांगत उत्तम चारित्र्य, संस्कारमय जीवन व शिस्तबद्ध आयुष्य घडविण्यासाठी शिक्षण हीच संधी असल्याचे सांगितले.तर  आलेल्या शाळेत तरी मुलांनाही मार्गदर्शन केले.

डॉ. विठ्ठल लहाने यांच्या बोलण्याने वातावरण पवित्रतेने भारावून गेले असल्याचे सांगत प्रा. श्रीधर भोंबे यांनी मंदिरात आल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. शिक्षणाधिकारी श्री. विठ्ठल भुसारे सर यांनी सांगितले की आजकाल चांगली बोलणारी, वागणारी माणसे फार कमी आहेत आणि अशी माणसे समाजासमोर आणण्याचे काम जिंतूर विकास चॅरिटेबल ट्रस्ट पुढच्या वर्षी अजून जोमाने करेल असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी मराठी पत्रकार संघाचे मा. अध्यक्ष शहजाद पठाण यांनी त्यांच्या शब्द भांडाराने इतका चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल जिंतूर विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. सुनिल बुधवंत यांचे अभिनंदन केले व सत्कार केला.

कार्यक्रमाचे रसदार सूत्रसंचालन साहित्यिक मयूर जोशी यांनी केले तर सन्मानपटाचे लेखन आणि वाचन प्रा. विलास पाटील सरांनी केले आणि ॲड. बि. के. घुगे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. बाळू बुधवंत, श्री. संजय आडे, श्री. संदीप गजभारे तथा जिंतूर शहरातील शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, झाड फाउंडेशन, वकील संघ, व्यापारी महासंघ, रमाई विचार मंच, मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, इलेक्ट्रॉनिक मीडिया, व्हॉइस ऑफ मीडिया आदी विविध संघटनांनी विशेष प्रयत्न केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या