💥परभणी जिल्ह्यातील नवउद्योजकांनी स्टँडअप योजनेंतर्गंत प्रस्ताव पाठवावेत.....!


💥असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे💥

परभणी (दि.18 जानेवारी) : केंद्र शासनाच्या स्टैंड अप योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकाकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या स्वहिस्सा २५ टक्के रकमेपैकी जास्तीत-जास्त १५ टक्के मार्जीन मनी शासनाकडून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुषंगाने परभणी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील सवलतीस पात्र उद्योजक लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या स्टैंड अप योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकाकरिता जास्तीत - जास्त लाभार्थ्यांना लाभ पोहोचण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन श्रीमती गुठ्ठे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या