💥गंगाखेड तालुक्यातील मौ.वृंदावन जवळा (रु) येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा......!


💥यावेळी भारतीय सैन्यात कार्यरत असणारे जवान अवधुत कदम यांनी सहपत्नीक जिजामातेच्या प्रतिमेचे पूजन केले💥

गंगाखेड (दि.१२ जानेवारी) - गंगाखेड तालुक्यातील मौजे जवळा (रु ) येथे  दि.१२ जानेवारी रोजी सकाळी मॉ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून. जवळा गावची शान असणारे  भारतीय सैन्यात कार्यरत असणारे अवधुत कदम यांनी सहपत्नीक  जिजामातेच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर सामुदायिक जिजाऊ वंदना झाली.

 त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून. नंतर घोषणा  देण्यात आल्या. तुमचं आमचं नातं काय,जय जिजाऊ जय शिवराय,-जिजाऊ मनामनात,! जिजाऊ जन्मोत्सव घराघरात  !अशाप्रकारे घोषणा देण्यात आल्या. यावेळी गावातील नागरिक व शिवभक्त उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील नवयुकांनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या