💥संभाजीनगर शिवसेनेच्या वतीने बजाजनगर येथे आयोजित श्री रामकथेचे विरोधी पक्षनेते दानवेंनी नागरीकांना दिले निमंत्रण...!


💥हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने श्री रामकथेचे आयोजन💥                          

  ✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना संभाजीनगर शाखेच्यावतीने आयोजित राम कथेला आमंत्रित करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कार्यक्रम पत्रिका देत नागरिकांची वैयक्तिक भेट घेऊन जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केलं. 

या दरम्यान शाळकरी मुलांच्या मनामध्ये प्रभू श्री रामांचे विचार रुजावेत यासाठी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शाळकरी मुलांना स्वतः त्यांची शाळेची बस थांबवून त्यांना पत्रकं देऊन आपल्या आईवडिलांना घेऊन कथा ऐकण्यास यावे, असे आवाहन केले. तसेच बजाजनगर परिसरातील जनतेची वैयक्तिक भेट घेऊन त्यांना रामरावजी ढोक महाराजांच्या श्री राम कथेचे आमंत्रण बजाजनगर परिसरात स्वतः घरोघरी जावून भेट घेत दिले.

दिनांक १९ जानेवारी ते २५  जानेवारी दरम्यान शिवस्मारक, रामलीला मैदान शेजारी बजाजनगर येथे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कथाकार रामायणाचार्य ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक यांच्या अमृतवाणीतून भाविकांना श्री रामकथेचे श्रवण करता येणार असून श्री रामकथा दिनांक १९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान सायंकाळी ६:३० ते ९:३० या वेळेत होणार आहे.

कार्यक्रमा निमित्त कार्यक्रमस्थळी साफसफाई करून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी  नागरिकांची वैयक्तिक भेट घेत  कार्यक्रम पत्रिका देऊन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.  या कार्यक्रमास बजाजनगर आणि पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. 

या कार्यक्रमास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर महिला आघाडी संपर्कप्रमुख आ.मनीषा कायंदे, आमदार उदयसिंह राजपूत, सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड,माजी महापौर नंदकुमार घोडेले, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, राजेंद्र राठोड ,विधानसभा संघटक सुशील खेडकर, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस प्रभाकर मते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या श्रीराम कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक: विरोधीपक्ष नेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आयोजक तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपतालुका प्रमुख सचिन गरड, कैलास भोकरे, विष्णू जाधव, गणेश नवले, कृष्णा राठोड, सुभाष साबळे, बळीराम पोले, नंदकुमार साळुंखे, शहरप्रमुख सागर शिंदे, उपशहरप्रमुख किशोर खांडरे, रमेश शेळके, विश्वास येवले,भाऊसाहेब डमाळे, विभागप्रमुख सुदाम भंडे, बिबान सय्यद, काकाजी जीवरग, कैलास हिवाळे,  रामनाथ सुरासे, शिवशंकर सगट, दत्तात्रय वर्पे, लखन सलामपुरे, दीपक कानडे, नामदेव सागडे, सतीश हीवाळे ,संतोष चंदन , शिवाजी ढेपे, करन साळे, विशाल खंडागळे, अमोल पोटे, प्रवीण चंदन ,नागेश कुकलारे, अमोल पवार, सरपंच मनीषा धोंडरे, जयश्री दिवेकर, अनिता हेकडे, लक्ष्मीबाई पवार, सुनिता राठोड, राधा राठोड, अमर राजपूत, संध्या सदावर्ते, उपसरपंच कपिंद्र पेरे, कडू कीर्तीकर, संजय झळके, शिवाजी मोरे, अर्जुन जोक, सुभाष खाडे, शोभा बनकर, विजय सरकटे, गौरव पाटील, सोमनाथ गायकवाड, योगेश पवार, सागर पाटील, साईनाथ वाघमारे, अनिकेत थोरात, मयूर लांडगे , प्रणव तवले, शुभम रोठे आशिष ताजने, विशाल पवार, शुभम केदार, विशाल सौदागर, फ्रफुल भोसले, धनंजय साळुंके, मंगेश चक्कर, गणेश खेडकर, निलेश गायकवाड, पवन देशमुख, दीप पवार, वैभव ढोरे, जिवेश चौधरी, लोकेश बारी, उज्वल ठोके, स्वप्नील पाटील, श्रीराज तवले, कृष्णा माने, महेंद्र खोतकर, मनोज गायके, निलेश चव्हाण, ज्ञानेश्वर गोल्हार, सुरेश राठोड , सजन पवार, मनोज पवार, गणेश वाघ, गणेश सूर्यवंशी, महेश घोडके, अक्षय साळुंखे, प्रशांत पाथ्रीकर, गौरव खणसे, स्वप्नील राठोड, विलास पडघन, बापू साळुंखे, अमित देशमुख, माऊली भगत, गोकुळ राठोड, प्रवीण चव्हाण, नवनाथ काळे, दिनेश लोंढे, श्रीकांत तुपे, अभिजीत खारतोडे, जय सौदागर, शुभम आडे, विक्की गिरे, संकेत वाळके, गणेश आवटे, दीप सौदागर, केतन बागडे, प्रज्वल शिंदे, गणेश गायके, प्रवीण साबळे, शुभम कदम, नितीन कलांत्रे , अण्णा कांडेकर, रमेश पाटील, महिला आघाडीच्या मंदाताई भोकरे, मीराताई पाटील, कमलताई गरड, छायाताई जाधव, शोभाताई सरकटे, अनिताताई डहारिया,  वैशालीताई जिवरग, अलकाताई शिंदे, मीराताई चव्हाण, जोत्सानाताई सोनवणे, रूपालीताई शुक्ला, मंदाताई तुपे ,सविताताई वैद्य, लताताई माळी, छायाताई कुकलारे ,रोहिणी ताई मुळे, मनीषा घाडगे ,विद्या राठोड यांनी केले आहे......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या