💥सेनगाव तालुक्यातल्या हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शाळेत खडकाळ जमिनीवर खूलवली पळसबाग....!


💥यामध्ये त्यांनी बांगी,कोबी,टोमैटो,पालक,संबार,मेथी,दोडके,चवळी .मुळा आदी भाजीपाल्याची केली लागवड💥 


शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

योग्य पद्धतीने परसबागेची आखणी केली  असेल तर  वर्षभर पुरेसा भाजीपाला उपलब्ध होतो.  लहान मुलांमधील कुपोषण तसेच इतर अनेक आजारांना आळा बसेल. तसेच पूर्ण कुटुंबाला पोषणयुक्त सेंद्रिय सकस भाज्या मिळतील. असाच उपक्रम हिवरखेडा येथील जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी व विध्यार्थीनी केला आहे.


हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शाळेत  खडकाळ जमिनीवर सेंद्रिय शेती पासून पळसबाग तयार केली आहे शाळेतील मागील ग्राउंड मध्ये विध्यार्थी आणि शिक्षकांनी अतिशय सुंदर अशी पळसबाग तयार केली आहे यामध्ये त्यांनी बांगि.कोबी.टोमैटो  पालक.संबार .मेथीदोडके .चवळी .मुळा .यांच्या सह आदी भाजीपाला शिक्षक व विध्यार्थीनी लागवड केला शाळेतील बोरवेल वरून या पळस बागेला पाणी दिल्या जाते विध्यार्थी व शिक्षक स्वता यांची निघा राखतात व या बागेतील भाजीपाला शाळेतील विध्यार्थी जेवणात वापर करतात विशेष म्हंजे हा भाजीपाला पूर्णपणे सेंद्रिय आहे हा शरीराला हानिकारक नाही त्यामुळे हणी देखिल पोवचत नाही.


सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा हें गाव सुमारे 3000 हजार लोक संख्येचे गाव आहे गावात  पहिली ते आठ वि पर्यन्त  जिल्हा परिषद शाळां आहे शाळेत सुमारे 121विध्यार्थी  या शाळेत शिक्षण घेतात विशेष म्हंजे शाळेत सर्व शिक्षक अगदी चांगल्या प्रकारे शिक्षण देतात त्यामुळे गावातील विध्यार्थी बाहेर कूठे शिक्षणघ्यायला जात नाहीत या पळसबागे सर्व नियोजन शाळेतील मुख्याध्यापक गाडेकर सर पवार सर पोपळघट सर मोरे सर बोराडे सर हें सर्व शिक्षक व विध्यार्थी ह्या पळस बागेची देखरेख करतात 

हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी व ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून शाळेची रंगरंगोटी केली आहे शाळेतील शिक्षकांनी स्वता पुढाकार घेऊन रंगरंगोटी साठी स्वता पाच पाच हजार प्रत्येकी शिक्षकांकडून 25 हजार रुपये जमा झाले होते व ग्रामस्थांच्या वतीने देखिल  तब्बल 75 हजार जमा झाले होते असे सर्व मिळून 1 लाख रुपये जमा झाले होते त्यातून पूर्ण शाळेची रंगरंगोटी करण्यात आली रंगरंगोटी मुले शाळेच्या भिंती देखिल बोलक्या झाल्या आहेत पूर्ण वर्गातील भिंतीवर बाराखडी उजळणी नकाशे वेगवेगळे चित्रे भिंतीवर रेखाल्यामुळे  लहान लहान विध्यार्थी त्यावरील चित्रे अभ्यास देखिल करत आहेत हिवरखेडा येथील एका ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेने हा आगळावेगळा उपक्रम राबल्यामुळे सर्व जिल्हा भरातून या शाळेचे कौतुक केल्या जात आहे असा आर्दश ईतर जिल्हा परिषद शाळेने देखिल घ्यावा आणि प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेतच टाकावे जने पालकांना मोठा खर्च करावा लागणार नाही.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या