💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी....!


💥यावेळी विशेष म्हणजे बालिका दिन साजरा करण्यात आला💥


पुर्णा (दि.03 जानेवारी) तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज मंगळवार दि.03 जानेवारी 2023 रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या लेखी बनवून प्रतिमेचे पूजन केले. विशेष म्हणजे बालिका दिन साजरा करण्यात आला या नंतर सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर भाषणे झाली यामध्ये अबोली आवरगंड या विद्यार्थीनीने  मनोगत व्यक्त केले. बालिका दिनानिमित्त वर्ग 7 वी विद्यार्थीनी दिव्या आवरगंड,मयुरी आवरगंड क्रांती आवरगंड, स्नेहा आवरगंड, दिशा वाघमारे, आरती आवरगंड या विद्यार्थीनीने सावित्रीबाई यांच्या वेषभुषेत आल्या होत्या.त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

बालिका दिनानिमित्त शाळेतील शिक्षिका सौ.ज्योती झटे मँडम यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र व त्यांनी स्त्रीयांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईनी दिलेले योगदान याबद्दल आपले विचार मांडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा.व्य.समिती अध्यक्ष श्री.शिवाजीराव आवरगंड हे होते,प्रमुख पाहुणे म्हणून बंडू गाडे,रंजित आवरगंड, संतोष आंबोरे,अनुरथ आवरगंड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.ढगे सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.पौळ सर.श्री.महाजन सर,श्री.शेळके सर यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या