💥सायबर गुन्ह्याबाबत प्रत्येकांनी जागृत रहावे : जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंह


💥वाशीम जिल्हा अर्बन बँकेच्या वतीने पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांचा सत्कार💥

(फुलचंद भगत)

वाशिम: आधुनिक तंत्रज्ञान हे विकासाचे साधन आहे. मात्र काही प्रवृत्ती याचा दुरोपयोग करून फसवणूकीचे प्रकार करीत असतात.  सायबर गुन्ह्याबाबत प्रत्येकांनी जागरूक राहणे जरूरी असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी केले.

  स्थानिक दि वाशीम अर्बन को. ऑप.बँकेच्या मुख्य सभागृहात मंगळवार 10 जानेवारी रोजी बँकेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात त्यांनी वरील प्रतिपादन केले. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी बँकेच्या अध्यक्षा श्रीमती शिलाताई राठी, उपाध्यक्ष पुरूषोत्तम चरखा, सत्कारमुर्ती जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल खंडेलवाल तथा गुन्हा शाखेचे प्रमुख सोमनाथ जाधव मंचावर उपस्थित होते. यावेळी वाशीम अर्बन बँकेच्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून फसवणूक करणार्‍या आंतरराज्य टोळीच्या पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले. अल्पावधीतच आरोपींना जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या नेतृत्वात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे बँकेच्या वतीने त्यांचा अध्यक्षा श्रीमती राठी, उपाध्यक्ष चरखा व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह बुके देवून सत्कार करण्यात आला. सोबतच बँकेचे संचालक कायद जोहरभाई, विपीन बाकलीवाल, राजेश सिसोदिया, प्रकाश भांदुर्गे तथा स्थानिक गुन्हे शाखेचे सोमनाथ जाधव यांचा वाशिम शाखा सभापती नितीन करवा, सल्लागार समिती सदस्य तरणसिंग शेठी, आसाराम जायभाये, निलेश सोमाणी, जितेंद्र गोधा,गोपाल बंग यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सदर पथकामध्ये कार्य करणारे एपीआय विजय जाधव, राजेश राठोड, अमोल इंगोले, प्रविण राऊत, पठाण या चमूचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वाशीम ठाणेदार शेख, हरिष राठी, आयटी प्रमुख कुणाल जाधव उपस्थित होते.  यावेळी बोलतांना जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी सांगीतले की, सायबर गुन्हे घडल्यानंतर अनेकजण तक्रारी करीत नसल्याने गुन्हेगाराला अभय मिळत असते.  मात्र वाशिम अर्बन बँकेने पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत रितसर तक्रार दाखल केली होती. त्यामुळेच पोलीस प्रशासनाने उत्तरांचल, कानपूर व वेगवेगळया ठिकाणाहून गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळविले आहे.  पोलीस हा नेहमी जनतेच्या मदतीसाठी असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली तर आर्थीक संस्था,व्यक्ती असो त्यांनी रितसर तक्रार दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सोबतच बँकेनेही सायबर गुन्हयाबाबत अधिक जागृत राहून ग्राहकांच्या हितासाठी पुढाकार घेणे जरूरी आहे. सर्वसामान्यांचा विश्वास हा अर्बंन बँकेवर असून त्यांची आयुष्याची पुंजी बँकेत जमा असते असे सांगून वाशीम अर्बंन बँकेची प्रशंसा केली.  कार्यक्रमाचे संचालन कर्मचारी प्रतिनिधी तेजराव वानखेडे तथा आभार मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल खंडेलवाल यांनी मानले. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी बँकचे संस्थापक स्व. रा.ग. राठी यांच्या पुतळयाला अभिवादन केले. सत्कार समारंभाला कर्मचारीवृंद उपस्थित होते....


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या