💥पुर्णा तालुका व्हाईस ऑफ मीडियाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सत्कार....!


💥तालुकाध्यक्ष आनंद ढोणे तालुका सरचिटणीस सुशील गायकवाड यांचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सत्कार💥 


पूर्णा (दि.०८ जानेवारी) : पत्रकार आणि पत्रकारितेसाठी देशपातळीवर वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या पूर्णा तालूकाध्यक्षपदी.आनंद ढोणे पाटील व सरचिटणीसपदी सुशिल गायकवाड यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल पूर्णा शहरातील क्रांतीनगर अलिनगर येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते अय्युबशहा शब्बीरशहा,मूनिर शब्बीरशहा,एजाज मगदूम शहा,खलिल बेग नशिर(सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी) व प्रहारचे पूर्णा शहरप्रमुख संजयजी वाघमारे,भटके विमुक्त जाती जमाती समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते फरिद शब्बीरशहा यांनी तारीख ७ जानेवारी २०२३ शनिवार रोजी सायंकाळी यथोचित सत्कार करुन पुढील पत्रकारिता आणि सामाजिक कार्यास सुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या