💥परभणीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत मॅराथॉन स्पर्धा संपन्न....!


💥मॅराथॉन स्पर्धेत पाराजी गायकवाड प्रथम तर रामेश्‍वर मुंजाळ द्वितीय💥


परभणी (दि.30 जानेवारी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कृष्ठरोग) यांच्या कार्यालयामार्फत स्पर्श कुष्ठरोज जनजागृती अभियान 2023 या उपक्रमातून आज सोमवार दि.30 जानेवारी 2023 रोजी आयोजित केलेल्या खूल्या मॅराथॉन स्पर्धेत पाराजी बापुराव गायकवाड यांनी प्रथम, रामेश्‍वर विजय मुंजाळ यांनी द्वितीय तर विष्णू विठ्ठलराव लव्हाळे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

         प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुलाच्या मैदानावर खूल्या मॅराथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रिडा संकूल ते विद्यापीठ प्रवेशद्वार तेथून पुन्हा जिल्हा क्रिडा संकूल असे पाच किलोमीटर अंतराची मॅराथॉन स्पर्धा पार पडली.  या स्पर्धेत दोनशेवर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे अबाल आणि वृध्द स्पर्धकांनीही स्पर्धेत सहभाग नोंदविला. विजेत्या स्पर्धकांना जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सहाय्यक संचालक डॉ. राहुल गीते यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम भेट देवून सन्मानित करण्यात आले.

         यावेळी जिल्हा ग्राम विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी रश्मी खांडेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सांवत, जिल्हा मॅराथॉन संघटनेचे सदस्य रणजित काकडे तसेच सहाय्यक संचालक आरोग्य सेवा या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार महादेव कांदे यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या