💥पूर्णा शहरात येत्या ३१ जानेवारी पासून अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात.....!


💥३१ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी अश्या दोन दिवस होणाऱ्या बौध्द धम्म परिषदेस जागतीक स्तरावरील बौद्ध भिक्खुंची राहणार उपस्थिती💥

पूर्णा (दि.२९ जानेवारी) - पूर्णा शहरात २० व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन व स्मृतीशेष भदंत उपाली थेरो यांचा ४० वा स्मृतीदिन दि. ३१ जानेवारी व ०१ फेब्रुवारी २०२३ या दिवशी आयोजित केला आहे संपूर्ण महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यातील पुर्णा शहरात होणाऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे वेगळे महत्व आहे. 


या वर्षी जागतीक स्तरावरील बौद्ध भिक्खुंची उपस्थिती लाभणार आहे. या परिषदेचे मुख्य संयोजन भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो हे आहेत.मंगवार दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०९.३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मा. ली. सुनाम ( सेऊल, साउथ कोरिया) यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहन, सकाळी १०.३० वा. बुद्धविहार येथे धम्म ध्वजारोहन करून सामुहिक त्रिरत्न बुद्धवंदना, पुजाविधी संपन्न होईल. दुपारी १२.३० वा. डॉ. आंबेडकर नगर येथे धम्म ध्वजारोहन झाल्यानंतर भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून निघेल. मिरवणूकीचा समारोप बुद्धविहार येथे होईल.

दुपारी ३.३० वा. डॉ. हाँग जीन सू (कोरियन धम्मा अँड मेडिसीन मास्टर प्रेसिडेंट ऑफ कोरियन ट्रेडिशनल मेडिसीन असोसिएशन सियोल) यांच्या हस्ते परिषेदचे उद्घाटन करण्यात येईल. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. ली. ची रॅन (झेन धम्मा मास्टर अँड एक्स-वाईस चान्सलर,साऊथ कोरिया) उपस्थित राहतील. यावेळी लुम्बिनी स्मरणिकेचे प्रकाशन मा. पार्क जाँगबे एम (सेऊल, साऊथ कोरिया) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

धम्म परिषदेत प्रथम सत्रामध्ये बुद्ध तत्वज्ञानातील कर्मसिध्दांत या विषयावर भदंत धम्मसेवक महाथेरो (अध्यक्ष, अखिल भारतीय भिक्खु संघ, महाराष्ट्र प्रदेश), भदंत शरनानंद महाथेरो (पाथरी), भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महाथेरो (जालना), भदंत सुमनवन्नो महाथेरो (चंद्रपूर), भदंत डॉ. यश काश्यपायन महाथेरो (जयसिंगपूर) यांची धम्मदेशना होईल द्वितीय सत्रामध्ये सुप्त पिठकातील उपासकांसाठी निवडक मार्गदर्शक तत्व या विषयावर भदंत सुमेधबोधी महाथेरो (वटफळी), भदंत प्रा.डॉ.एम. सत्यपाल महाथेरो (औरंगाबाद), भदंत डॉ. इंदवंश महाथेरो (औरंगाबाद), भदंत ज्ञानरक्षित थेरो ( औ बाद.), भदंत विररतन थेरो (मुंबई), भदंत धम्मबोधी थेरो (औ.बाद) यांचे प्रवचन होईल दुसरे दिवसी बुधवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठिक १०.३० वा. शांतीनगर पूर्णा येथे भिक्खु संघाच्या हस्ते धम्म ध्वजारोहन, त्रिरत्न वंदना व प्रवचन होईल. सकाळी ११.३० वा.मा. उपनगराध्यक्ष उत्तम मुगाजी खंदारे यांच्याकडे भिक्खु संघाला भोजनदान व नंतर धम्मदेशना होईल.

दुपारी २.०० वा. बुद्धविहाराच्या प्रांगणात प्रथम सत्र होईल. बुद्ध तत्वज्ञानातील कर्म सिध्दांत या विषयावर भदंत डॉ. खेमधम्मो महाथेरो (मुळावा), भदंत करूणानंद थेरो (औ.बाद), भदंत पय्यातीस्स थेरो (सिरसाळा), भदंत पय्यारत्न थेरो (नांदेड), भदंत महाविरो थेरो (काळेगाव) यांचे प्रवचन होईल.द्वितीय सत्रात बौद्ध धम्मप्रचार व प्रसारात उपासकांची सम्यक भूमिका या विषयावर भदंत मुतीतानंद थेरो (परभणी), भदंत धम्मधर थेरो (जालना),भदंत पय्याबोधी थेरो (खुरगाव), भदंत पय्यानंद थेरो (लातूर), भदंत धम्मशिल थेरो (बीड) यांचे प्रवचन होईल.

प्रमुख उपस्थिती – भदंत धम्मानंद थेरो ( औ बाद), भदंत बोधीधम्मा बौद्ध धम्माचल, अजिंठा), भदंत शिलरत्न थेरो (नांदेड), भदंत धम्मसार थेरो (किल्लारी), भदंत नागसेन बोधीथेरो (उदगीर), भदंत सुमेधजी नागसेन (खरोसा), भदंत सुभूती थेरो (नांदेड), भदंत संघपाल थेरो (वाजेगाव), भदंत रेवतबोधी ( आम्रवन महाविहार, देवगाव),भदंत पय्यावंश (बुद्धविहार पूर्णा, संयोजक), भन्ते संघरत्न ( आम्रवन महाविहार देवगाव) धम्म परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून खा. संजय उर्फ बंडू जाधव,आ.डॉ.राहुल पाटील,जिल्हाधिकारी आचल गोयल (भा.प्र.से.),डॉ.एस.पी. गायकवाड (चेअरमन - पी. ई. एस. मुंबई), इंजि. अनिलकुमार ब. गायकवाड (जॉईट मॅनेजिंग डायरेक्टर एम.एस.आर.डी.सी.मुंबई.), मा.जियोंग ह्यांग क्योंग (सेऊल द कोरिया), सिने अभिनेता गगन मल्लीक, डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबीरे (महाराष्ट्र प्र.काँ.अनु.जातीविभाग), उद्योगपती सी. आर. सांगलीकर (अध्यक्ष, अथर्व चंद्रकांत सांगलीकर चारिटेबल ट्रस्ट गुगवाड ता. जत जि. सांगली),प्रो.वैज्ञानिक डॉ. सिध्दार्थ एम. जोंधळे उपस्थित राहणार आहेत.

धम्म परिषदेच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे अहवान भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, भन्ते पय्यावंश व बोधिसत्व डॉ.बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समिती, भारतीय बौद्ध महासभा तालूका शाखा व शहरातील सर्व महिला मंडळानी केली आहे. यानिमित्त पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी भंते पय्यावंश, बुद्ध विहार समितीचे सचिव अँड महेंद्र गायकवाड, रिपाई नेते प्रकाश कांबळे, श्रीकांत हिवाळे, विजय बगाटे पत्रकार, किशोर ढाकरगे, साहेबराव सोनवणे, राहुल धबाले, राम भालेराव, सम्राट अहिरे ,व इतर उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या