💥सुर्यकांत विश्वासराव शिक्षकांच्या सन्मानाची लढाई लढत आहेत : यशवंत मकरंद


💥सुर्यकांत विश्वासराव यांच्या प्रचारा साठी आयोजीत झंझावती दौऱ्यात ते बोलत होते💥

परभणी (दि.२० जानेवारी) : मराठवाडा शिक्षक संघाचे अधिकृत ऊमेदवार सुर्यकांत विश्वासराव हे शिक्षकांच्या सन्मानाची लढाई लढत असल्यामुळे शिक्षक मतदारसंघात  त्यांची लाट आहे अश्या भावना परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांनी व्यक्त केल्या.सुर्यकांत विश्वासराव यांच्या प्रचारा साठी आयोजीत झंझावती दौऱ्यात ते बोलत होते.

या वेळी शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष नारायण कदम यांनी शिक्षक मतदार संघ हा राजकिय हस्तक्षेपा पासुन दुर  असावा असे मनोगत व्यक्त केले तर शिक्षक संघाचे युवा नेतृत्व निशांत हाके यानी आरपारच्या लढाई साठी शिक्षक  ऐक्याची वज्रमुठ निर्माण करण्याचे आवाहन केले.आजच्या प्रचार दौ-यात  *भारतीय बाल विद्या मंदिर,बाल विद्या मंदिर,वैभव नगर,बाल विद्या मंदिर,मुख्य शाखा,गांधी विद्यालय, एकता,गांधी विद्यालय,कृषी सारथी,सुमनताई गव्हाणे विद्यालय,म.फुले विद्यालय,सारंगस्वामी विद्यालय,मुंजाजी शिंदे विद्यालय,आनंद माध्यमिक विद्यालय*  येथील शिक्षकांशी संवाद साधण्यात आला तर दुपारच्या सत्रात यशवंत मकरंद,एन.टी.कदम,नारायण कदम,डी.के.देवकते,निशांत हाके,राहुल गौंडगावे यांच्या नेतृत्वात *पेडगाव,ताडबोरगाव,कोथाळा,करंजी* या ग्रामिण भागातील शाळेतील शिक्षकवृंदाशी संवाद साधला.

सर्व ठिकाणी मराठवाडा शिक्षक सघाला ऊस्फुर्त समर्थन मिळत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या