💥पुर्णा तालुका व्हाईस ऑफ मीडीया संघटनेची कार्यकारिणी जाहीर....!


💥तालुकाध्यक्षपदी आनंद ढोणे पाटील यांची निवड💥

पूर्णा (दि.०३ जानेवारी) - : व्हाईस ऑफ मीडीया या देशपातळीवरील पत्रकार संघटनेची महत्वपूर्ण बैठक मंगळावर दि.३ जानेवारी २०२३ रोजी पूर्णा शहरातील तिरुपती उडपी रेस्टॉरंट येथे संपन्न झाली.यावेळी व्हाईस ऑफ मीडीयाच्या तालूकाध्यक्षपदी आनंद ढोणे पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. व्हाईस ऑफ मीडीया ही संघटना पत्रकार आणि पत्रकारितेसाठी वैशिष्ट्यपूर्ण काम करणारी आहे.


या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे आरोग्य,तालूका स्तरावर पत्रकार भवन, पत्रकारांना घरे यासाठी देशभर मोठे काम सुरु आहे. व्हाईस ऑफ मीडीयाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पूर्णा तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.यावेळी व्हाईस ऑफ मीडीयाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण चौधरी,शहराध्यक्ष अक्षय मुंडे व देवानंद गुंडाळे,जेष्ठ पत्रकार सतिश टाकळकर,अतूल शहाणे,संपत तेली हे प्रमुख उपस्थित होते.यावेळी व्हाईस ऑफ मीडीयाच्या पूर्णा सरचिटणीसपदी सुशिल गायकवाड,कार्याध्यक्षपदी नारायण सोनटक्के, उपाध्यक्षपदी सय्यद सलीम,गजानन नाईकवाडे,सह सरचिटणीसपदी शिवबाबा शिंदे,कोषाध्यक्षपदी ज्ञानदेव बोबडे,कार्यवाहक संजय पांचाळ,संघटक तुकाराम ढोणे,प्रसिद्धी प्रमुख जनार्धन आवरगंड, सदस्य म्हणून नवनाथ पारवे,दिपक साळवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरम्यान,व्हाईस ऑफ मिडियाचे सरचिटणीस सुशील गायकवाड यांनी आनंद ढोणे यांचे नाव तालूकाध्यक्षपदी सुचविले त्याला सर्व सदस्यांनी अनुमोदन देत पाठिंबा दर्शवला. या प्रसंगी, परभणी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी व्हाईस ऑफ मीडीयाच्या कामाबद्दल सखोल मार्गदर्शन करत पत्रकारांच्या आगामी काळाचा लेखाजोखा मांडला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या