💥नवीन वर्षानिमित्त 55 वंचित अनाथ बालकांना जीवनावश्यक वस्तू,किराणा साहित्य देऊन नवीन वर्ष साजरे....!


 💥एचएआरसी संस्थेचा अत्यंत कौतुकास्पद उपक्रम💥

परभणी (दि.01 जानेवारी) - नवीन वर्ष प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करत असतो. नववर्षाचे औचित्य साधुन आज होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थे तर्फे 'माझं घर' काटगाव ता जि लातूर येथील 55 वंचित बालकांना दोन घास प्रेमाचे देण्यासाठी 'प्रकाशवाटा' या व्हाट्सएपच्या ग्रुपवर आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास ग्रुप वरील महाराष्ट्रातील सर्व सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जवळपास 21 हजार रुपये जमा झाले. या मदतीतून जवळपास 20 दिवस पुरेल इतका 21 हजार रुपयांचा जीवनावश्यक किराणा साहित्य विकत घेण्यात आले. 


माझं घर :  कळंब रोड वर माणूस प्रतिष्ठान तर्फे काटगाव ता जि लातूर येथे शिक्षणापासून वंचित व एकल पालक बालकांसाठी 'माझं घर' हा प्रकल्प शरद झरे व संगीता झरे हे कोणत्याही शासकीय मदत न घेता लोकसहभागातून चालवतात. त्या प्रकल्पाची बिकट आर्थिक परिस्थिती पाहता एचएआरसी संस्था परभणी तर्फे जून 2021 पासून एचएआरसी संस्थे तर्फे तेथील 55 मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्या मुलांना वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य तसे इतर गरजा लक्षात घेऊन मदत केली आहे. नुकतेच त्यांनी समाजमाध्यमावर बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सर्वसामान्य दात्यांना जीवनावश्यक किराणा साहित्यासाठी मदतीची हाक दिली होती.

म्हणूनच होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज चे अध्यक्ष डॉ पवन चांडक व एचएआरसी संस्थेच्या टीम सदस्यांनी शरद झरे यांच्याशी फोनवर चर्चा करून समस्या समजवून घेऊन त्यांना या बिकट आर्थिक परिस्थितीत मदत करण्याचे आश्वासन दिले. ज्यास प्रकाशवाटा ग्रुपवरील दात्यांनी प्रतिसाद दिला व मदतीचा ओघ सुरू झाला. आज जवळपास 21,000/- रुपयांचा संपूर्ण किराणा सामान ज्यात कडधान्ये, गहू, डाळी, पोषक आहार मटकी, चना, तेल, मिरची, मसाला, तांदूळ, खिचडी साहित्य, रोज नाश्ता व जेवणासाठी लागणारे सर्व साहित्य पोहा रवा,  इत्यादी साहित्य आज संस्थेत सुपूर्द करण्यात आले. 

एचएआरसी संस्थेने दिलेल्या मदतीमुळे आनंदित होऊन 'माझं घर' संस्थेचे संस्थापक श्री शरद व संगीता झरे दाम्पत्याने आभार मानून आशीर्वाद दिले. या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी एचएआरसी संस्थेचे डॉ पवन चांडक, डॉ आशा चांडक,  राजेश्वर वासलवार, विठ्ठल गोरे,  प्रा शिवा आयथळ, राजेंद्र वडकर ,योगेश पाटील, नितीन देशमुख प्रशांत इटकर, सत्यंजय हर्षे, कु. केनिषा धामणगावकर यांनी सहयोग दिला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या