💥जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथे 33 के व्ही उपकेंद्रातील अतिरीक्त विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न..!


💥पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलकाला आत्मदहन करण्यापासून केले परावृत्त💥

जिंतूर (दि.27 जानेवारी) - तालुक्यातील आडगाव बाजार येथे मागील अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव होत असल्याने येथील 33 के.व्ही उपकेंद्राला अतिरिक्त 5 मेगावॉट ट्रान्सफॉर्मर देण्यात यावा यासाठी एक महिन्यापूर्वी महावितरण कंपनीला निवेदन देऊन देखील महावितरण प्रशासनाने मागणीची दखल न घेतल्यामुळे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2023 रोजी गावकरी मंडळींनी आंदोलनाचा इशारा दिला होता यावेळी आंदोलकांतील प्रल्हाद दाभाडे यांनी पोलिस प्रशासनासह महावितरण कंपनीनी अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या समोर सोबत आणलेल्या बाटलीतून स्वतःच्या डोक्यावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करून दाभाडे यांना आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले यावेळी महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांनी लेखी आश्वासन दिल्याने हे आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले आहे.


आडगाव बाजार येथे 33 के.व्ही उपकेंद्रात 5 मेगावॉट पावर ट्रान्सफॉर्मर देण्यात यावा यासाठी  आडगाव येथील प्रल्हाद दाभाडे यांनी 28 डिसेंबर रोजी महावितरण प्रशासनाला निवेदन देऊन 33 के.व्ही उपकेंद्राला 5 मेगावॉट वीजनिर्मिती चे ट्रान्सफॉर्मर देण्यात यावा नसता 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्यात येईल असा इशारा दिला होता मात्र महावितरण प्रशासनाने आंदोलनाचे गांभीर्य न घेतल्याने दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 10 च्या सुमारास ग्रामस्थांच्या समोर आडगाव बाजार येथील महावितरण कार्यालय समोर प्रल्हाद दाभाडे यांनी स्वतःच्या डोक्यावर व अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस हवालदार जिया खान यांनी तात्काळ त्यांच्या हातातील बाटली बाजूला करून आत्मदहन करण्यापासून रोखले दरम्यान पोलिसांनी 

महावितरण कार्यालयातील अधिकारी यांच्याशी संवाद साधून आंदोलनकर्त्यांना कनिष्ठ अभियंता लेखी आश्वासन देऊन 15 जानेवारीपर्यंत नवीन ट्रान्सफर आडगाव बाजारला देणार असल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी  जर येणाऱ्या 15 ऑगस्ट पर्यंत 33 के.व्ही  उपकेंद्रात 5 मेगावॉटचा ट्रांसफार्मर महावितरणाने दिला नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळेस उपस्थित ग्रामस्थांनी दिला आहे या आंदोलनात सरपंच मंचकराव खंडागळे,सुंदर नाईक, विश्वनाथ राऊत,काशीनाथ राऊत,सह शंभरच्या वर ग्रामस्थांची उपस्थित होती.पो. नि. विकास कोकाटे, यांच्या उपस्थित पोलीस पथक घटनास्थळी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या