💥पूर्णेत फोटोची दि.26 जानेवारी पासून भाववाढ,फोटोग्राफर्स असोसिएशनची घोषणा....!


💥कच्च्या साहित्याचे भाव प्रचंड वाढल्याने नाईजास्तव फोटोच्या भावात नाममात्र वाढ - अध्यक्ष नरेश यादव  

पुर्णा (दि.१८ जानेवारी) - नुकत्याच झालेल्या फोटोग्राफर बांधवांच्या एका मेळाव्यात फोटोग्राफी साठी लागणाऱ्या कच्च्या साहित्याचे भाव प्रचंड वाढल्यामुळे नाईजास्तव फोटो च्या भावात नाममात्र वाढ करत असल्याचे अध्यक्ष नरेश यादव यांनी स्पष्ट केले आहे.


ज्येष्ठ फोटोग्राफर आर्यन अण्णा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर मेळावा उत्साहात संपन्न झाला त्यात सदर भाववाढ करण्यात आली आहे, यावेळी पूर्णा तालुक्यातील सर्व फोटोग्राफर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, यामधे अर्जेंट पासपोर्ट साइज् फोटो 6 नग=रू.60, स्टुडिओ 4x6 softcopy=100 रुपये, तसेच दोन दिवसांनी पासपोर्ट फोटो 12 नग=60रुपये जाहीर करण्यात आली,तसेच सर्व ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन सर्व पूर्णा तालुका फोटोग्राफर असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या