💥राज्य शासनाच्या 'अपघात व सुरक्षा मोहीम" 2023 चे औचित्य साधून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन....!


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शंकरराव नांदेडकर अध्यक्ष विश्वासु प्रवासी संघटना हे होते💥

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सुरक्षितता अभियान "सडक सुरक्षा जीवन रक्षा" दि. 11 जानेवारी ते 25 जानेवारी 2023 अंतर्गत राज्य शासनाच्या "अपघात व सुरक्षा मोहीम" 2023 चे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड व  विश्वासु प्रवासी संघटना नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन बसस्थानक प्रमुख कार्यालय नांदेड या ठिकाणी आज करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शंकरराव नांदेडकर अध्यक्ष विश्वासु प्रवासी संघटना हे होते तर प्रमुख उद्घाटक म्हणून आशिष मेश्राम आगार प्रमुख नांदेड व विशेष सहकार्य नेत्र तज्ञ डाॅ. रेखाताई चव्हाण यांची उपस्थिती होती.

यावेळी इजिं.हरजिंदर सिंघ संधू कार्यालयीन प्रमुख विश्वासु प्रवासी संघटना नांदेड,यासीन खान बसस्थानक प्रमुख, तसेच राज्य दैनिक बाळकडू चे  उत्तर विधानसभा पत्रकार संभाजी सूर्यवंशी, विश्वासु प्रवासी संघटनेचे ललीताताई कुंभार, नेहा शर्मा,रमाकांत घोणसिकर,गणपत पांचगे,दिगंबर पवार,वरिष्ठ लिपिक नितीन मांजरमकर , वाहतूक निरीक्षक अविनाश भिसे,राजू निलेकर,चालक मठपती,कट्रोलरडि.व्ही.घोरंबाड,जसप्रित कौर,बी.एम शिंदे उपस्थित होते.


 बसस्थानक व.टी.आगारातील चालक वाहक व तांत्रिकी कर्मचारी जे उपलब्ध असून जे  प्रवास्यासाठी जे नेहमी तत्पर असतात त्त्यांच्यासाठी व प्रवास्यासाठी "मोफत नेत्र तपासणी आयोजन" शिव नेत्रालयाचे डाॅ रेखाताई चव्हाण याच्या विशेष सहकार्याने करण्यात आले होते तसेच भिवराज  कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूट सिडको नांदेड येथील परिचारिका पंचशीला लांडगे,शितल जोंधळे,नेहा वन्ने,पूजा भुरे यांनी परिश्रम घेतले.

या शिबिरात 100] चालक , वाहक व यांत्रिक प्रशासन कर्मचारी व 50 प्रवास्यांची तपासणी करण्यात आली  चालक,वाहक,कर्मचारी व प्रवासी   यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वनी विश्वासु प्रवासी संघटनेचे व कार्यालयीन प्रमुख इजिं.हरजिंदर सिंघ संधू,प्रवासी संघटनेचे व बसस्थानक प्रमुख यासीन खान यांचे आभार व्यक्त केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या