💥गंगाखेड तहसिल समोर दि.20 फेब्रुवारी रोजी डोंगरी जन परिषदेचे उपोषण....!


💥डोंगरी भाग जाहीर करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी करणार उपोषण💥


गंगाखेड : डोंगरी भाग जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी डोंगरी जन परिषदेच्या वतीने डोंगर भागातील जनतेचे गंगाखेड तहसील कार्यासमोर 20 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी भव्य असे धरणे आंदोलन करून डोंगर भागातील प्रत्येक गावाचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री तथा डोंगरी भाग विकास समितीचे अध्यक्ष यांना पाठवण्यात येणार आहेत डोंगरी भाग जाहीर करून डोंगरी भाग विकासाच्या विविध योजना डोंगर भागातील गावात राबवण्यात याव्यात व डोंगर भागातील विद्यार्थ्यांना दोन टक्के डोंगरी आरक्षणाचा लाभ मिळावा या मागण्यासाठी 20 फेब्रुवारीला धरणे आंदोलन केले जाणार आहे या धरणे आंदोलनात डोंगर पिंपळा येथील गावकरी मंडळींनी सहभागी होऊन आपल्या गावचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना  देण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान करताना डोंगरी जन परिषदेचे मुख्य संयोजक पंडितराव घरजाळे व उपस्थित डोंगर पिंपळा येथील गावकरी मंडळी....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या