💥पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर : विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार....!


💥राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर💥 

 ✍️ मोहन चौकेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असून मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 चे लोकार्पण त्यांच्या हस्ते होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महत्त्वपुर्ण बैठक झाली. भाजपने मिशन मुंबई महापालिका निवडणूक सुरू केलं आहे. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला मोठे महत्त्व आहे.

महाविकास आघाडी स्थापन होऊन आता जवळपास अडीच वर्ष होत आली आहेत असं असताना भाजपनं मिशन 2024 च्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरू केली. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून तयारी सुरू आहे. अद्याप यावर अंतिम निर्णय बाकी आहे.

दुसरीकडे ठाण्यामध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात कॅन्सर हॉस्पिटलच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष उपस्थित नाही राहिले तर ऑनलाईन तरी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला घेऊन भाजप अत्यंत गांभीर्यपूर्वक नियोजन करत असून प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस व इतर प्रादेशिक पक्ष यांनी सध्या तरी लोकसभा निवडणुकीवर काम सुरू केल्याचे तूर्तास दिसत नाही. या  2024 च्या लोकसभा निवडणुकीत तयारीत भाजपने  आघाडी घेतल्याचे दिसून येते आहे                                          

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या