💥परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांनी 19 जानेवारी 2023 पर्यंत खर्चाचा ताळेबंद सादर करावा....!


💥असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती दाभाडे यांनी केले💥 

परभणी (दि.13 जानेवारी) : जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी 19 डिसेंबर 2023पर्यंत एकूण खर्चाचा ताळेबंद निवडणूक विभागाला सादर करणे आवश्यक असून, सर्व उमेदवारांनी तो विहित नमुन्यात सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती दाभाडे यांनी केले आहे.   महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांनी (बिनविरोध निवडून आलेले, पराभूत झालेले) निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यापासून 30 दिवसांच्या आत शपथपत्रासह विहित निवडणुकीचा एकूण खर्च दाखल करणे आवश्यक आहे. खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना पदावर राहण्यास व पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी निवडणुकीचा निकाल घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक‍ लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी 19 जानेवारीपर्यंत निवडणुकीचा एकूण खर्च संबंधित तहसील कार्यालयाकडे शपथपत्रासह विहित नमुन्यात दाखल करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)  स्वाती दाभाडे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या