💥परभणी तालुक्यातील मौजे उखळद,पिंप्री देशमुख येथील अवैध रेती साठ्याचा दि.13 जानेवारी रोजी जाहीर लिलाव....!


💥अशी माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालय परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे💥

परभणी (दि.06 जानेवारी) - परभणी तालुक्यातील मौजे उखळद येथील अंदाजे 323, रहाटी 685, संबर 61, धसाडी 40 आणि कोतवाली पोलीस स्टेशन येथील 5 ब्रास जप्त केलेल्या अवैध रेती साठ्याचा दि.13 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजता उपविभागीय कार्यालय, परभणी येथे जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. जप्त केलेल्या रेती साठ्यासाठी ज्यांना लिलावात भाग घ्यावयाचा आहे, त्यांना अटी व शर्तीस अधीन राहून लिलावात सहभागी होता येईल.अशी माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालय, परभणी यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

               जप्त रेती साठ्यातील रेती खरेदीसाठी लिलावात भाग घ्यावयाचा असल्यास इच्छुकांना अटी व शर्तीच्या अधिन राहून लिलावात बोली बोलता येईल. सरकारी किमतीच्या एक चर्तुर्थांश रक्कम लिलाव सुरु होण्यापूर्वी लिलावात भाग घेणाऱ्यांकडून घेण्यात येईल. तसेच वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे परभणी उपविभागीय अधिकारी कार्यालयांने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या