💥जिंतूर तालुक्यातील टाकळखोपा येथील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश....!


💥माजी आ.विजय भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर :- टाकळखोपा येथील भाजप कार्यकर्त्यांचा भाजप मधील ध्येय धोरणे व स्थानिकच्या गटबाजीला कंटाळून  मा.आ.विजयराव भांबळे  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यात बाबाराव घुगे, रुपेश घुगे, विठ्ठल घुगे, देवबा वाव्हळ, रहीम शेक, विष्णू वाव्हळ, अमोल महाराज घुगे, नरुजी दळवे, मुंजाजी दळवे, विलास दळवे, वामन पवार, विक्रम दळवे, पांडुरंग माळकरी, पिंटू जाधव, मथु जाधव, गणेश जाधव, रामराव जाधव, विजय माने, दिलीप वाघमारे, वामन घनसावंत, लक्ष्मण गहुगे, जगन घुगे, रमेश वाव्हळ, बाळू राठोड, कैलास वाघमारे व लक्ष्मण जाधव ई. नी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मा.आ.विजय भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. 

तसेच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जिल्हा संयोजक शंकर जनार्दन माने रा.जवळा (खुर्द) यांच्यासह अविनाश गंगाधरराव भिसे, मैनाजी विक्रम माने, रा. जवळा (खुर्द) ता .जिंतूर यांनी मा.आ. विजयराव भांबळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. 

     यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभैय्या चौधरी, माजी समाजकल्याण जि.प.सभापती रामराव उबाळे, महिला तालुका अध्यक्षा मनीषाताई केंद्रे, माजी  पंचायत समिती सभापती गणेशराव इलग,  माजी प.स.सदस्य राहुल कनकुटे, इत्यादी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या