💥शिवसेना आमदार डॉ.राहुल पाटील यांची माहिती💥
परभणी (दि.२५ डिसेंबर) : शहरातील सर्व प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करून गरजेनुसार त्यांच्यावर आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत अशी माहिती आमदार डॉ.राहुल पाटील यांनी आरोग्य शिबीरात बोलताना दिली या शिबिरात ६३० जेष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सुयोग कॉलनी येथे रविवार,दी.२५ डिसेंबर रोजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंचच्या वतीने जेष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी आमदार डॉ.पाटील बोलत होते या वेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे, शिव अल्पसंख्याक सेना जिल्हाध्यक्ष करामत खान, रवींद्र पतंगे, शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार, दलित आघाडी तालुका प्रमुख सुभाष जोंधळे, नवनीत पाचपोर, युवासेना शहर प्रमुख बाळराजे तळेकर, विशु डहाळे, दलित आघाडी शहर प्रमुख अमोल गायकवाड, उपशहर प्रमुख मारोती तिथे, राहुल खटींग, किशोर रणेर, गौतम भराडे, बबलू घागरमाळे, यशवंत खाडे आदी उपस्थित होते. यावेळी सुयोग कॉलनीतील ओपन जिमचा लोकार्पण सोहळा व शिवसेना व युवा सेना शाखेचे उद्घाटन आमदार डॉ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील व मतदार संघातील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यासह अन्य सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आमदार डॉ.पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या संकल्पनेतून काही दिवसापूर्वी वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंचची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक प्रभागात दर तीन महिन्याला ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे़ यात मधुमेह, रक्तदाब, हृदय तपासणी, मोतीबिंदू तपासणी यांचा समावेश आहे. या उपक्रमाची सुरुवात रविवारी सुयोग कॉलनी येथे करण्यात आली. या उपक्रमांतर्गत प्रत्येक प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था, छोटे उद्यान, वाचनालय अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
पुढे बोलताना आमदार डॉ.पाटील म्हणाले की,ज्येष्ठ नागरिकांची सेवा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे़ उतार वयात ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये त्यांना सर्व आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी हा मंच स्थापन केला आहे़ ज्येष्ठांसाठी वाचनालय असो की विरंगुळा म्हणून उद्यान हे आपण सर्व प्रभागात निर्माण करणार आहोत यासोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थक्षेत्र, पर्यटनासाठी देखील पुढाकार घेतला जाईल. याशिवाय जेष्ठ नागरीकांच्या पेंशन संदर्भात तसेच घरगुती काही अडचणी असल्यास त्या देखील सोडवल्या जाणार असल्याचे आमदार डॉ.पाटील यांनी यावेळी सांगितले़ यावेळी सुयोग कॉलनी व परीसरातील जेष्ठ नागरीक मंचच्या प्रमुखपदी केशव कच्छवे यांची तर सचिवपदी घनशाम नवले यांची नेमणूक करण्यात आली
प्रास्ताविक मनोज काबरा यांनी केले सुत्रसंचलन राहुल वहीवाळ यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय मुंडे, मनोज काबरा, रमेश शिर्के, नरेश देशमुख, शिव चव्हाण, रूपेश देवढे, नवले, गोकुळ दाड काशिनाथ साखरे, गोविंद कोंडावार, गंगाधर गवळी, गंगाधर देवढे, प्रकाशराव भिसे, दिपक साखरे, आकाश चरकपल्ली, रितेश देशमुख, लखन गमे, सुजित मजकुरे, बालाजी जोंधळे, अशोक वाटोळे, राहुल रणवीर, संकेत शिंदे, सुरेश शिंदे, सचिन खाडे, अभिजीत वाटोळे, दिनेश सावंत, नितीन चव्हाण, राहुल रणवीर यांनी परीश्रम घेतले या कार्यक्रमास सुयोग कॉलनीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते......
0 टिप्पण्या