💥हिंगोलीत अतिक्रमण धारकांकडून पोलिस प्रशासन व पालिकेच्या गाड्यांवर दगडफेक....!


💥संतप्त अतिक्रमण धारक जमावाने केलेल्या दगडफेकीत एका कर्मचाऱ्यासह एक पत्रकार ही झाला जखमी💥


✍🏻शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या परिसरात उर्वरीत अतिक्रमण काढून घेण्याबाबत सुचना देण्यासाठी गेलेल्या पोलिस अन् पालिकेच्या कर्मचाऱ्यावर नागरिकांनी दगडफेक केल्याचे घटना शनिवारी ता. 17 दुपारी एक वाजता घडली आहे. यामध्ये पालिकेचा एक कर्मचारी  व एक पत्रकार गंभीर जखमी झाले असून पोलिस वाहनाच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. या भागात आता पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या परिसरात असलेले 195 नागरीकांचे अतिक्रमण शुक्रवारी महसुल प्रशासनाने हटविले. यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, तहसीलदार नागनाथ वागवाड, पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी उशीरापर्यंत सदर अतिक्रमण काढण्यात आले.


हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव परिसरातीलअतिक्रमण काढण्याची मोहीम काल शुक्रवारपासून सुरूआहे. सदर मोहीम सोमवार पर्यंत स्थगित करण्यात आली असताना उर्वरित अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन करण्यासाठी गेलेल्या नगरपरिषद कर्मचारी व पोलिसांवर जमावाने तुफान दगडफेक केली. यामध्येन.प.चे कर्मचारी जखमी झाले.तर अंबिका टॉकीजपरिसरात याचदरम्यान वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावरही जमावाने दगडफेक केली.


दरम्यान, तलावाच्या दुसऱ्या बाजुला असलेले सुमारे 30 पेक्षा अधिक अतिक्रमणधार कांचेही अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.त्यासाठीआज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पालिकेचे कर्मचारी बाळु बांगर, पंडीत मस्के,रवी दरक, माधव सुकटे, दिनेश वर्मा, सुनील देवकर यांच्यासह पोलिसांचे पथक त्या भागात गेले होते. यावेळी पालिकेचे कर्मचारी मस्के यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे अतिक्रमधारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सुचना देत होते. यावेळी अचानक जमाव पोलिस वाहन व कर्मचाऱ्याच्या समोर आला अन् त्यांनी दगडफेक करण्यास सुरवात केली. या दगडफेकीत पंडीत मस्के यांच्या डोक्याला दगड लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सोबतच पोलिसांच्या वाहनाच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानतंर पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या