💥परभणीत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांची रॅली संपन्न.....!


💥या रॅलीला अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला💥 


परभणी (दि.०३ डिसेंबर) : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज समाज कल्याण विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथून दिव्यांगांची प्रभातफेरी काढण्यात आली. या रॅलीला अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते झेंडी दाखवण्यात आली. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रशांत दलाल व प्रा. कार्ले उपस्थित होते दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिणगीरे, वैसाका सय्यद हुसेन, दिव्यांग शाळांमधील विद्यार्थी, संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या