💥पुर्णा तालुक्यात गौण खनिज माफियांचा धुमाकूळ : महसुल प्रशासन गाढ झोपेत...?


💥जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी तालुक्यात अधिकृत ७ स्टोन क्रेशरची नोंद मग अनाधिकृत कसे चालतात दिड डझन क्रेशर💥

परभणी जिल्हाधिकारी दफ्तरी पुर्णा तालुक्यात अधिकृत २० स्टोन क्रेशरची नोंद झालेली असली तरी यातील तब्बल  १३ स्टोन क्रेशरच्या परवान्यांची मुद्दत संपलेली असून उर्वरीत ७ स्टोन क्रेशर पैकी मौ.खडाळा परिसरात ०६ तर बलसा (बु) येथे ०१ मग उर्वरीत स्टोन क्रेशर अधिकृत की अनाधिकृत ? असा प्रश्न उपस्थित होत असून जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह जिल्हा महसुल प्रशासनाच्या डोळ्यात झोकून प्रतिरोज हजारो ब्रास गौण-खनिज दगडाचे खानपट्यातून बेकायदेशीर उत्खनन करून बेकायदेशीररित्या चालणाऱ्या   स्टोन क्रेशरच्या माध्यमातून गिट्टी तयार करून महसुल प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडवून शासकीय गुत्तेदारांना या अनाधिकृत गिट्टीचा पुरवठा केला जात असतांना स्थानिक महसुल प्रशासनासह तहसिलदार टेमकर या खनन माफियांना पाठीशी का घालीत आहे ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.


तालुक्यात बेकायदेशीरपणे बिना परवाना चालणाऱ्या स्टोन क्रेशरला स्थानिक  महसुल प्रशासन,प्रदुषण महामंडळ तसेच विद्युत महावितरण कंपनीचे देखील पाठबळ असल्याचे निदर्शनास येत असून राजरोसपणे बेकायदेशीर चालणाऱ्या स्टोन क्रेशर चालकांकडून विद्युत चोरी केली जात आहे.संबंधित ७ कायदेशीर परवानाधार स्टोन क्रेशरसह बेकायदेशीर चालणाऱ्या १३ अनाधिकृत स्टोन क्रेशर चालकांकडे (मायनिंग प्लँन) प्रदुषण मंडळाचा परवाना आहे काय ? संबंधित गावातील ग्रामपंचायत कार्यालयाची एनओसी आहे काय ? या प्रश्नांची उत्तर महसुल प्रशासन देईल काय ? स्थानिक महसुल प्रशासन अर्थात तहसिलदार यांना केवळ ५०० ब्रास रॉयल्टीचा अधिकार असतो तर २५०० ब्रास रॉयल्टीचे अधिकार एसडीओला असतात मग प्रतिरोज हजारो ब्रास दगडाच्या उत्खनन करून त्याचे गिट्टीत रुपांतर करीत त्या गिट्टीची शासकीय गुत्तेदारांना बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे अधिकार गौण  खनिज माफियांनी कोणी दिले ? संबंधित स्टोन क्रेशर धारकांना मायनिंग प्लॕनमध्ये किती उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे ? जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आंचल गोयल याकडे लक्ष देतील काय ? एकंदर तालुक्यात महसुल प्रशासन मेहरबान तर गौण खनिज माफिया बेभान...असा कारभार सर्वत्र चालत असल्याचे निदर्शनास येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या