💥परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व आत्माच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर....!


💥किड व्यवस्थापना मध्ये ट्रायकोकार्ड चा वापर व निर्मिती तंत्रज्ञान या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन💥

परभणी (दि.29 डिसेंबर) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व आत्मा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने कीड व्यवस्थापना मध्ये  ट्रायकोकार्ड चा वापर व 'निर्मिती तंत्रज्ञान या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण' 20 शेतकरी उपस्थित होते कार्यक्रम कृषि माहिती तंत्रज्ञान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे संपन्न झाला.


कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.पी.आर.देशमुख,डॉ.जी.डी .गडदे, डॉ डी डी डी पटाईत डॉ.मधुमती कुलकर्णी   एम बी मांडगे व आत्मा चे प्रकल्प संचालक श्री विजय लोखंडे उपस्थित होते.  या प्रशिक्षणाकरिता परभणी जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. सदर ट्रेनिंग सदरील प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना जैविक कीड व्यवस्थापन एकात्मिक कीड व्यवस्थापन तसेच रायगडच्या जैविक शेतीमध्ये महत्त्व त्याची निर्मिती याबाबत सखोल अशी मार्गदर्शन विद्यापीठातील तज्ञ प्राध्यापक डॉ. पटाईत डॉ. श्रद्धा दुर्गुडे,  डॉ. एम बी मांडगे यांनी केले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी सर्व सहभागी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र उपसंचालक आत्मा  प्रभाकर बन सावडे.  कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ जी डी गडदे ,डॉ.मधुमती कुलकर्णी व डॉ पटाईत यांच्या हस्ते  देण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या