💥परभणी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीला यश.....!


💥बाल संगोपन योजनेचे रखडलेले अनुदान लाभार्थांच्या खात्यावर जमा💥


परभणी - महिला व बालविकास विभागाकडुन राबविण्यात येणा-या बालसंगोपन योजनेचे २०२१ मधील अनुदान तसेच चालु वर्षाचे अनुदान परभणी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे ७० ते ८० लाभार्थ्यांचे अनुदान रखडले होते, त्यामुळे एकल पालक व निराधार असलेल्या मुलांना अनुदानाची रक्कम मिळत नव्हती. या बाबत अनेक लाभार्थी महिलांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी तक्रार करुन बालसंगोपन योजनेचे अनुदान तात्काळ मिळावे या करिता पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. या तक्रारीची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलींग बोधने यांनी अनुदानापासुन वंचीत लाभार्थी महिला व पक्षाच्या पदाधिका-यांच्या शिष्टमंडळासह अतिरीक्त जिल्हाधिकारी श्री. प्रताप काळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन तक्रार दाखल केली होती व रखडलेले अनुदान लाभार्थ्यांना लवकर मिळावे अन्यथा जिल्हा महिला व बाल विकास कार्यालया विरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या तक्रारी नंतर अतिरीक्त जिल्हाधिकारी श्री प्रताप काळे यांच्या दालना मध्ये झालेल्या बैठकी मध्ये परभणी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी लाभार्थ्यांच्या खाते क्रमांकामध्ये झालेल्या चुकीमुळे अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाली नाही हे मान्य केले व खाते क्रमांकाच्या तांत्रिक अडचणी तात्काळ दुरुस्त करून अनुदानाची रक्कम १५ दिवसाच्या आत लाभर्थ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल असे अश्वासन दिले होते.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी या बाबत कार्यवाही करत प्रहार जनशक्ती पक्षाला लेखी पत्रा देऊन लाभार्थ्याच्या खाते क्रमांकामध्ये असलेल्या चुका दुरुस्त करण्यात आल्या असुन जे लाभार्थी अनुदानापासून वंचीत होते अशा लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे व या बाबत कामामध्ये कसुर करणा-या कार्यालयातील संबंधीत कमचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असुन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे लेखी कळविले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढाकारा मुळे ७० ते ८० लाभार्थ्यांना बालसंगोपन योजनेचे अनुदान मिळाल्यामुळे संबंधीत लाभार्थ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहे यात प्रहार जनशक्तीपक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, गजानन चोपडे, शहर प्रमुख धमेंद्र तुपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, महिला आघाडी शहर चिटणीस अॅड. सुवर्णाताई देशमुख, महिला आघाडी शहर चिटणीस सुशमाताई देशपांडे, शेख बशीर, सय्यद युनूस, संगीता गायकवाड, कान्होपात्रा जाधव, पुजा शिंदे आदींनी पुढाकार घेतला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या