💥यावेळी ८६ स्पर्धकांनी भाग घेतला होता या स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांनी केले💥
जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर
दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता जांभरुण फाटा ते माऊली मंदिर देवस्थान चारठाणा आयोजित १६०० मीटर धावण्याची स्पर्धा फौजी ग्रुप जांभरुण यांच्यावतीने ठेवण्यात आली होती.
यावेळी ८६ स्पर्धकांनी भाग घेतला होता या स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांनी केले सोबत चारठाणा पो.स्टेशन चे बीट जमादार कुटे साहेब माजी उपसरपंच तहेसीन देशमुख रुग्णवाहिका चालक शेख ईसाखोद्दीन पत्रकार रगंनाथ गडदे दिलीप माघाडे उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५००० रुपये अजय पालवे, द्वितीय पारितोषिक २००० रुपये नानासाहेब राऊत, तृतीय पारितोषिक १००० रुपये प्रदीप गिरी यांच्या वतीने ठेवण्यातआले होते या स्पर्धेत चार मिनिट ३४ सेकंदात १६०० मीटर धावून शिवाजी मधुकर बुधवंत रा. बेलखेडा याने पहिले पारितोषिक ५००० पटकावले,
व चार मिनट 35 सेकंदात १६०० मीटर धावून द्वितीय पारितोषिक तुकाराम आसाराम मुंडे रा.अंगलगाव यांने दुतीय पारितोषिक २००० रुपये पटकावले चार मिनीट ४० सेकंदात १६०० मीटर धावून गोविंद काशिनाथ चट्टे रा.वाई यांनी १००० रुपये पारितोषिक पटकावले,प्रोत्साहनपर पारितोषिक सतीश गीते रा.पिंपरी यांना देण्यात आले या स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण विद्यार्थी प्रेक्षक उपस्थित होते.
या स्पर्धेचे आयोजन अजय पालवे, विष्णू आघाव, रघुनाथ आघाव, नवनाथ पालवे, कुमार सानप, गणेश आघाव, जनार्धन सांगळे, विकास आघाव, अमोल आघाव, रवी आघाव यांनी केले स्पर्धा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पालवे सर यांनी केले......
0 टिप्पण्या