💥पुर्णेत भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन...!


💥अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वी गायक प्रकाश जोंधळे त्यांच्या संच गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न💥


पूर्णा (दि.०६ डिसेंबर) - पुर्णा येथे भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमितान आज मंगळवार दि.०६ डिसेंबर रोजी सकाळी ९-०० वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात विश्वरत्न भारतरत्न महामानव  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत निळ्या झेंडयाचे ध्वजारोहण करून अर्ध्या वरती उतरण्यात आला तर दुपारी ०२-०० वाजता बुद्ध विहारात भगवान बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून भन्ते पयावश यांनी त्रिशरण पंचशिल बुद्ध वंदना घेतली. बाबासाहेबाच्या तैल चित्राची शोक मिरवणूक बुद्ध विहार ते मुख्य रस्त्यावरून डॉ. बाबा साहेब आबेडकर चौकात अभिवादन सभेत रूपांतर करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष उत्तम खदारे भन्ते पंयावश भन्ते पंचांदीप प्रकाश काबळे प्रा आशोक काबळे प्रमुख वक्ते प्रा.एम एम सुरनर प्रा.डॉ.अजय गव्हाणे प्राचार्य के राजकुमार प्रमुख उपस्थिता मध्ये अड धम्मा जोधळे दादाराव पंडित अड हर्षवर्धन गायकवाड अनिल खर्गखराटे शामराव जोगदड मुकूद भोळे दिलीप गायकवाड रौफ कुरेशी पी.जी. रणवीर शामराव जोगदंड बौद्धाचार्य त्र्यंबक काबळे अतूल गवळी अमृत कहाळे याच्या सह बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी साहेबराव सोनवणे सुरज जोंधळे विजय खडागळे राहूल धबाले यांनी केले.


अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वी गायक प्रकाश जोंधळे त्यांच्या संच गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलतांना प्रा.सुरनर म्हणाले की महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेवून आचरणात आणा असे प्रतिपादन त्यांनी केले पुढे बोलतांना ते म्हणाले की महिलांना आपल्या मुलांवर बाबासाहेबांचे विचार संस्कार केले पाहिजे बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचे पालन करीत बाबासाहेबाचे भक्त न बनता त्यांच्या आदर्श विचाराचे अनुयायी बना असे विचार त्यांनी मांडले.

यावेळी बोलतांना प्रा.अजय गव्हाणे यांनी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले आहे या संविधानामुळे सर्व एकत्र नांदत आहे बाबासाहेबाचे विचार म्हणजे क्रांती आहे त्यांच्या विचारांच आचरण करा असे आवाहन त्यांनी केले यावेळी पुर्णा पोसिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सुभाष मारकड,सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड,महिला पोलीस उपनिरिक्षक भिसे,गोपनीच शाखेचे भगवान वाघमारे विष्णू एम.पी राखुडे यांनी चोख बंदोबस्त दिला....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या