💥नागपूरात अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला भुलली मुले : चॉकलेट्स खाऊन शाळेतील १८ चिमुकल्यांना विषबाधा.....!

💥नागपूर मधील 'मदन गोपाळ अग्रवाल हायस्कूल' या शाळेत घडला हा गंभीर प्रकार💥

नागपूर : एका अनोळखी व्यक्तीने वाटलेली चॉकलेट्स खाल्ल्यामुळे नागपूरच्या एका शाळेतील तब्बल १८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णलयात उपचार सुरु आहेत या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी या घटनेने नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार, नागपूरच्या मदन गोपाळ अग्रवाल हायस्कूल या शाळेत हा प्रकार घडला. 

पालकांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक काळ्या रंगाची कार शाळेबाहेर येऊन थांबली या कारमधून तोंडावर मंकी कॅप घातलेली एक व्यक्ती उतरली या व्यक्तीने शाळेबाहेरच्या आवारात जमलेल्या मुलांना चॉकलेट्स वाटली आणि संबंधित व्यक्ती तिथून निघून गेला ही चॉकलेट्स मुलांनी खाल्ली. एक-दोन चॉकलेट्स खाल्लेल्या मुलांना फारसा त्रास जाणवला नाही मात्र, अनोळखी व्यक्तीकडून चार ते पाच चॉकलेट्स घेऊन खाल्लेल्या मुलांना त्रास जाणवायला लागला.

 ही बाब शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर १८ मुलांना नजीकच्या लता मंगेशकर रुग्णालयात तातडीने दाखल केले येथील डॉक्टरांनी या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केले तेव्हा या शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. सुदैवाने एकाही मुलाची प्रकृती गंभीर नाही सर्व मुलांची प्रकृती उपचारानंतर स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. 

या घटनेची माहिती मिळताच मुलांच्या पालकांनी लता मंगेशकर रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यामुळे सध्या रुग्णालयातील बालरुग्ण विभागाबाहेर पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर पालकांनी शाळेच्या सुरक्षाव्यवस्थेतबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत मुलांना चॉकलेटस वाटणारी व्यक्ती नेमकी कोण होती ? याचा अद्याप उलगडा झालेला नाही पोलिसांकडून सध्या याप्रकरणाचा तपास सुरु आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या