💥अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुर्णा तालुकाध्यक्ष पदावर रामराव मोरे पाटील यांची नियुक्ती....!


💥रामराव मोरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर तालुकाध्यक्ष पदाची जवाबदारी देण्यात आली💥

पूर्णा (दि.०२ डिसेंबर) - अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुर्णा तालुकाध्यक्ष पदावर नुकतीच रामराव मोरे पाटील यांची निवडकरण्यात आली आहे.

रामराव मोरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर तालुकाध्यक्ष पदाची जवाबदारी देण्यात आली असून नियुक्तीपत्रात असे नमूद करण्यात आले आहे की आपण मराठा समाजाच्या उद्धारासाठी सतत कार्यरत कार्य करावे व समाजाच्या विविध घटकांसाठी स्थाई उपक्रम व कार्यक्रम राबविण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करून सर्व नवे जुने कार्यकर्ते सभासद यांना बरोबर घेऊन संघटनेच्या बांधणीसाठी कार्य करावे ज्यामुळे संघटनेचे कार्य समाधान कारक व प्रगती पथावर जाईल असे स्पष्ट केले नियुक्तीपत्रात नवनियुक्त तालुकाध्यक्ष रामराव मोरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या असून यावेळी जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब बाचाटे,सतीशराव खडके,मधुकर चोपडे,भानुदासराव सुर्यवंशी,रमेशराव सुर्यवंशी आत्माराम कलिदर,चंद्रकांत निर्वल,नामदेव बोकरे,माधव बोबडे,सुभाष घटोळ,दशरथ काळबांडे,सदाशिव नवघरे,प्रल्हाद बोकारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या