💥पूर्णा येथील कै. विठ्ठलराव मोरे मुकबधिर अस्थिव्यंग विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा....!


💥यावेळी विद्यार्थ्यांची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली💥 


   
पूर्णा :- येथील कै. विठ्ठलराव मोरे मुकबधिर अस्थिव्यंग विद्यालयात हेलन केलर यांची जयंती अर्थात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली शाळेत हेलन केलर जयंती निमित्त विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले.

     या प्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक विजय बगाटे, उपमुख्याध्यापक माधव नागठाणे, अनिल क्षिरसागर, सौ. विमलताई पाटील, श्रीमती स्वाती जाधव, दत्ता कदम, बालाजी शेप, विमलबाई दवणे, शिवाजी कदम, शे. गफार, शे. नईम कुरेशी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या