💥जिंतूर येथे जागतिक अपंग दिन संत श्री पाचलेगावकर निवासी अस्थिव्यंग शाळेत साजरा....!


💥शहरातील विविध भागात रॅली काढून जागतिक अपंग दिन साजरा💥


जिंतूर प्रतिनिधी बि.डी. रामपूरकर

जिंतूर शहरातील श्री संत पाचलेगावकर महाराज निवासी आस्थिव्यंग (दिव्यांग) विद्यालय व निवासी मतिमंद शाळा जिंतूर यांच्या वतीने आज दि. ०३ डिसेंबर रोजी शहरातील वसंतराव नाईक पुतळा, अण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,पर्यंत रॅली काढून जागतिक अपंग दिन हा साजरा करण्यात आला.


०३ डिसेंबर हा जागतिक अपंग, दिव्यांग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या दिवशी समाजात दिव्यांगा बाबत समाजात जनजागृती होण्यासाठी दिव्यांगांचा सर्वांगीक विकास होण्यासाठी मदत होईल. तसेच त्यांच्याबाबत समाजात आदर, सहानुभूती, सन्मान निर्माण होईल, त्यांच्या अडचणी समजतील आणि त्यांच्या अडचणीवर सहजतेने मात करता येईल. यासाठी अपंग दिन साजरा करण्यात आला.

यावेळी निवासी मतिमंद शाळेचे व श्री संत पाचलेगावकर महाराज निवासी जास्थिव्यंग विद्यालयाचे मुख्याध्यापक राऊत सर, जुबड़े सर, गवई सर, राठोड सर, एन एन सिद्दिकी, डी यू राठोड, सौ छायाबाई, श्रीमती संजीवनी समवेत मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या