💥पूर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावर प्रवासस्यांसह रेल्वे मालमत्ताही असुरक्षित.....!


💥प्रवास्यांसह रेल्वे संपत्तीच्या सुरक्षेसाठी तात्काळ कठोर निर्णय घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेस व महाबोधी न्युज प्रतिनिधीची मागणी💥

मराठवाडा विभागातील सर्वात महत्वपुर्ण रेल्वे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा रेल्वे स्थानकावर प्रवासी व त्यांच्या मालमत्तेसह रेल्वे संपत्तीच्या समस्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून याही पेक्षा गभीर बाब म्हणजे अत्यंत महत्वपुर्ण समजल्या जाणाऱ्या या पुर्णा जंक्सन रेल्वे स्थानकावर यात्रेकरूना अनेक असुविधांना देखील वेळोवेळी सामोरे जावे लागत आहे.


दक्षिण मध्य रेल्वे विभागाती रेल्वे स्थानकांवरील सुविधांचा आढावा घेण्यासाठी आलेले रेल्वे महाव्यवस्थापक श्री.अरुणकुमार जैन यांना मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाचे रेल्वे जंक्शन पूर्णा रेल्वे स्थानकावरील असुविधा तसेच प्रवास्यांच्या असुरक्षेसह रेल्वे संपत्तीच्या असुरक्षितते संदर्भात देखील महाबोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख प्रदीप नन्नवरे यांनी प्रत्यक्ष भेटून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रताप कदम यांनी आपले निवेदन त्यांना पाठवून प्रवासी सुरक्षा तसेच रेल्वे संपत्तीच्या सुरक्षेसह संदर्भात तात्काळ कठोर निर्णय घेण्याची मागणी केली दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे रेल्वे महाव्यवस्थापक श्री.अरुणकुमार जैन यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, पूर्णा जंक्शन स्थानकावरील रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांच्या असुरक्षिततेच्या संदर्भात, जे अत्यंत मानले जाते. संपूर्ण मराठवाडा विभागातील महत्त्वाचे म्हणजे एक प्रश्नचिन्ह वारंवार दिसून येत आहे. पूर्णा रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाणे आहे, मात्र पोलीस कर्मचारी संख्या केवळ दोन/तीन असल्याने प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे मालमत्तेची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे येथे रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन, आपणं प्रवाशांच्या तसेच रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेला प्राधान्य द्या. अर्जातील वरील मागण्यांकडे विशेष लक्ष देऊन त्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.....


1) लोहमार्ग पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून एक सहायक पोलीस अधिकारी व 10 ते 12 पोलीस कर्मचारी नेमावेत...

(२) रेल्वे संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून, रेल्वेची मालमत्ता सुरक्षिततेला प्राधान्य द्या.

३) वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारांची वाढती संख्या पाहता लोकोशेड आणि रेल्वे स्थानक क्रमांक चारच्या आसपासचा तडीपार परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावा आणि या परिसराभोवती सुरक्षा भिंत बांधण्यात यावी

४) पूर्णा रेल्वे स्थानक क्रमांक एकवरील रेल्वे तिकीट खिडकी तात्काळ उघडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना जारी करावे...

५) संपूर्ण रेल्वे स्थानकांवर पाण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त दराने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश जारी करावे...

 6) पुर्णा रेल परिसर मध्ये रस्त्यांचे बांधकाम सुरु आहे, हे बांधकाम बोगस करण्यात आले आहे, यामध्ये नुकत्याच बांधण्यात आलेल्या रेल्वे कम्युनिटी हॉल ते विजय नगर डिप पर्यंतच्या हॉटमिक्स रस्त्याच्या कामाची त्वरित चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी .

रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. जैन यांना दिलेल्या अर्जावर ते काय निर्णय घेतात याकडे प्रवासी वर्गासह संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे........  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या