💥परभणी जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत आयोजित चाचा नेहरू महोत्सवाचा समारोप....!


💥खासदार फौजीया खान यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून या महोत्सवाचा समारोप💥

परभणी (दि.03 नोव्हेंबर) : जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत 1 ते 3 डिसेंबर या कालावधीत चाचा नेहरू  महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.


 
या महोत्सवातंर्गत शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आज लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे खासदार फौजीया खान यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून या महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

यावेळी पाच वेळा महाराष्ट्र शासनाचा वांग्मय पुरस्कार प्राप्त श्री. अल्लाउद्दीन, जिपचे उपमुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. भुसारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या