💥औरंगाबाद जिल्ह्यातील 'सिल्लोड कृषी महोत्सवात' परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त संख्येने सहभागी व्हावे....!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आवाहन💥

परभणी (दि.१६ डिसेंबर) : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सिल्लोड येथे एक जानेवारी रोजी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील जास्तीत -जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.

सिल्लोड येथे हा महोत्सव एक ते पाच जानेवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आला असून, आगामी वर्ष हे 'आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष' साजरे करण्यात येत आहे. पौष्टिक तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा यासारख्या पिकांचा समावेश आहे. पिकांचे आहारामधील महत्त्व समजण्यासाठी जिल्हा कृषि महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. 'शेत तिथे पौष्टिक तृणधान्य' मोहिमेमध्ये पिक प्रात्यक्षिक, मिनीकिट वाटप शेतकरी शेतीशाळा व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कृषि महोत्सवात कृषि प्रदर्शन, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विद्यापीठाचे स्टॉल, विविध कृषि निगडीत साहित्याचे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम व शासकीय विभागाचे एकूण ६०० स्टॉल उभारण्यात येणार आहेत तसेच विशेष चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे तरी परभणी जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व प्रगतशील, प्रयोगशील शेतक-यांनी या महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.

या महोत्सवात शेतकऱ्यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले असून त्यामुळे राज्यस्तरीय कृषि महोत्सवासंदर्भात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दवंडी देण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील सूचना फलकावर कृषि महोत्सवाची माहिती देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी येथील स्टॉल्सवर त्यांची उत्पादने लावावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा विजय लोखंडे यांनी केले आहे......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या