💥पुर्णेत शासकीय गुत्तेदारांना अवैध 'स्टोन क्रेशर' चालकांकडून बेकायदेशीर गौण खनिजाचा पुरवठा ?


💥बेकायदेशीर चालणाऱ्या 'स्टोन क्रेशर' धारकांशी 'गॅलकॉन इन्फरा प्रा.लि.' कंपनीचा बांधकाम मटेरीयल सफ्लाईचा करार ?💥


पुर्णा (दि.१४ डिसेंबर) - पुर्णा तालुक्यात परभणी जिल्हा महसुल प्रशासन गौण खनिज विभागाच्या दफ्तरी अधिकृत/अनाधिकृत नोंद असलेल्या २० स्टोन क्रेशर पैकी केवळ ७ स्टोन क्रेशर परवाना धारकानी आपले परवाने नुतनीकरण केले असून संबंधित स्टोन क्रेशर धारक कमी अधिक प्रमाणात शासकीय महसुलाची पुर्तता करतात या ७ परवाना धारक स्टोन क्रेशर खदान मालकांमध्ये ६ स्टोन क्रेशर खदान मालक तालुक्यातील मौ.खडाळा परिसरातील असून १ स्टोन क्रेशर खदान परवाना धारक तालुक्यातील मौ.बलसा येथील आहे. संबंधित परवाना धारक 'स्टोन क्रेशर' पुर्णा शहरापासून मौ.खडाळा तब्बल २४ किलोमीटर तर मौ.बलसा १६ ते १७ किलोमीटर असल्यामुळे या अधिकृत परवाना धारक 'स्टोन क्रेशर' चालकांकडून गिट्टी/दगड घेणे शासकीय गुत्तेदारांना परवडणारे नसल्यामुळे शहराच्या आसपास अनाधिकृतपणे लाखो रुपयांचा शासकीय महसुल बुडवून चालणाऱ्या 'स्टोन क्रेशर' चालकांकडून संबंधित शासकीय बांधकाम गुत्तेदार अनाधिकृतपणे बांधकाम मटेरियल पुरवठ्याचे कोणत्या आधारे करार करून या बेकायदेशीर  मटेरियल खरेदी करून शासकीय विकासकाम करीत आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत असतांना स्थानिक महसुल प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांसह तहसिलदार पल्लवी टेमकर प्रतिरोज लाखों रुपयांचा महसुल बुडवून राजरोसपणे प्रचंड प्रमाणात खदाणीतून दगडाचे स्फोटकांद्वारे बेकायदेशीर उत्खनन होत असतांना साखर झोपेत आहे काय ? असा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत आहे.


पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावर तब्बल १०० कोटी रुपयांच्या शासकीय निधीतून निर्माण होणाऱ्या रेल्वे उड्डान पुल बांधकामाचे टेंडर घेतलेल्या गुत्तेदार कंपनी गॅलकॉन इन्फरा प्रोजेक्ट प्रा.लि.'या कंपनीला हजारो ब्रास निकृष्ट दर्जाच्या गिट्टीचा पुरवठा केला जात असल्यामुळे महसुल प्रशासन गौण खनिज विभागाच्या नियमांची अक्षरशः पायमल्ली तर होतांना दिसतच आहे याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसुल चोरांच्या घशात जात असून संबंधित गॅलकॉन इन्फरा प्रोजेक्ट प्रा.लि.'या कंपनीला बेकायदेशीर चालणारे 'स्टोन क्रेशर' चालक शासकीय गौण खनिजाची खुलेआम चोरी करून लाखों ब्रास गिट्टी/दगड आदी मटेरियलचा पुरवठा करीत असतांना व कंपनीने ढोणे पांगरारोड व ताडकळस फाट्या लगत हजारो ब्रास अनाधिकृत निकृष्ट गौण खनिज रेती/गिट्टीचा साठा करून सदरील बांधकाम मटेरियल रेल्वे उड्डान पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यास सुरुवात केल्यामुळे सदरील पुलाच्या निकृष्ट बांधकामाचा दर्जा पुन्हा एकदा कॉलिटी कंट्रोल अॉफीसर्सनी तपासण्याची वेळ आलेली आहे.


संबंधित उड्डाण पुलाच्या बांधकामाला दि.२७ ऑगस्ट २०१९ रोजी सुरुवात झाली होती या बांधकामाला सुरुवात तब्बल ३ वर्ष ४ महिण्यांचा कालावधी उलटला म्हणजे ४० महिण्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील या रेल्वे उड्डानपुलाचे काम अत्यंत कासवगतीने व निकृष्ट दर्जाचे होतांना दिसत असून यापुर्वी मागील १६ जुन २०२२ रोजी उड्डान पुलाचे सिमेंट कॉक्रेंचे पिल्लरचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्या प्रकरणी तब्बल १२ पिल्लर व १० आरसीसी गडर पाडन्यात आले होते यानंतर गॅलकॉन इन्फरा प्रोजेक्ट प्रा.लि.'या कंपनीला रेल्वे उड्डान पुलाचे बांधकामाचे गुत्ते देण्यात आले परंतु या कंपनी कडून देखील पुलाचे बांधकाम अत्यंत संथगतीने व दर्जाहीन होत असल्याचे दिसत आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या